हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

गावचा विकास लोकसहभागातूनच शक्य – चंद्रकांत बोडरे गटविकास अधिकारी

(जावली/ अजिंक्य आढाव ) – लोकसहभागातून केलेल्या विकास कामांमुळे गावचे येणाऱ्या काळात चित्र बदलेल.प्रत्येक नागरिकांना गावासाठी तन मन धन देऊन निस्वार्थी काम केले पाहिजे तर गावचा विकास होईल .शासनाच्या विविध योजना गावला विकासाचा दृष्टिकोन निर्माण करतील, दत्तक योजनेत जावली गावचा सहभाग असुन नक्कीच आदर्श गाव म्हणून ओळखलं जावली गावाची होईल असे गटविकास अधिकारी- चंद्रकांत बोडरे कार्यक्रमा वेळी बोलतं होते.

गावामध्ये कोणती कामे करणे आवश्यक आहे, विकासकामांची अवस्था काय आहे, कोणती कामे प्राधान्याने होणे आवश्यक आहे याची माहिती घेण्याबरोबरच गावात कोणत्या घटकांना रोजगाराची आवश्यकता आहे, किती दिवसांचा रोजगार त्यांना हवा आहे याची सर्वंकष माहिती गोळा करुन त्याचा अहवाल तयार होणार आहे. कार्यक्रमावेळी जावली गावच्या सरपंच सौ. सुरेखा बुधावले,आय.आय.केअर फाऊंडेशन बारामती चे विठ्ठल भापकर, गोविंद फाऊंडेशन डॉ.शांताराम गायकवाड,पाणी फाऊंडेशनचे किशोर ईगंवले, अजय माने, अजिंक्य पाटील, हिम्मत पवार, जेष्ठ नेते तुकाराम बरकडे, उपसरपंच सुनीता बाबर माजी सरपंच ज्ञानेश्वरी मकर, ग्रा.सदस्य मोहन नाळे, पोलीस पाटील – भरत मोरे, अनिता नाळे, रामचंद्र गावडे आदी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आय.आय.केअर फाऊंडेशन (बारामती) या संस्थेचे संचालक डॉ.संतोष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावली गाव दत्तक घेऊन मोठ्या प्रमाणात जावली गावात जलसंधारणाचे कामे गेल्या 8-9 महिन्यापासून सुरू आहेत. या कामाच्या माध्यमातून संपूर्ण क्षेत्रामध्ये जलसंधारण कामे करून 15 लाख झाडांचा संकल्पना ठेवली आहे.

विविध विकासकामातुन रस्ते दुरुस्ती, शुद्ध पाणी, आरोग्य केंद्र उभारणे, वाचनालय, व्यायाम शाळा,या बरोबर तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असे कामकाज केले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!