हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

विडणी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरट्यांनी घरे फोडली

(जावली/ अजिंक्य आढाव) विडणी ता. फलटण काल मध्यरात्री दोन घरात चोरी करून सुमारे २५ हजार रुपयांची रोकड व देवाच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, विडणी ता फलटण येथील विडणी(२५फाटा) येथील दादासाहेब महादेव बोडके यांच्या घराच्या दाराची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी काल मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घरातील बंद कपाट फोडून १२हजार रुपये रोकड व देव्हाऱ्यातील मूर्तीवरील सुमारे २ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले त्यानंतर याच चोरट्यांनी बोडके यांच्या घराजवळच राहणाऱ्या सचिन संपत तावरे यांच्या बंगल्यात घुसले माञ तावरे यांच्याच दुसऱ्या घराच्या कढी कोयंडा तोडून घरातील कपाटातील ८ हजार रुपये व शर्टच्या खिशातील ५ हजार रुपये रोकड चोरून घेऊन गेले या वेळी घरातील सर्व वस्तू इतरत्र फेकून दिल्या होत्या.

सदर घटनेची नोंद दादासाहेब बोडके व सचिन तावरे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून बीट अंमलदार ओंबासे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!