हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर जशास तसे उत्तर  : ओबीसी संघर्ष समिती ऍक्शन मोडवर

(जावली/अजिंक्य आढाव) – संपूर्ण राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या भावना तीव्र झाले आहेत. या पुढे आमचे नेत्यांवर विविध माध्यमातून पातळी सोडून हल्ले होत आहेत मा. छगन भुजबळ, मा. गोपीचंद पडळकर, मा. महादेव जानकर व इतर सर्वच ओबीसी नेत्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर जसे तसे उत्तर देऊ ओबीसी नेते तथा गोपीचंद पडळकर यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आहे त्याचा फलटण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो असा इशारा ओबीसी संघर्ष समितीचे बापूराव शिंदे यांनी फलटण तालुक्यातील नाना पाटील चौक येथे रस्ता रोको वेळी इशारा दिला ‌.

ओबीसी नेते विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे फलटण तालुका विषय संघर्ष समितीच्या वतीने भ्याड हल्ला केल्याप्रकरणी दोषीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

इंदापूर येथे दोन दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी फलटण येथे ओबीसी समाजातर्फे फलटण बंद चे आवाहन करण्यात आले होते मात्र प्रशासनाची विनंती आणि फलटण तालुक्यातील प्रसिद्ध रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर फलटण बंद आंदोलन मागे घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलकांच्या वतीने घेण्यात आला होता.
फलटण येथील पुणे पंढरपूर रोडवरील क्रांतीसिंह नाना पाटील चौक सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.पुणे पंढरपूर बाजूकडे जाणारी येणारी वाहने रोखण्यात आली त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या रस्त्या रोकोमुळे चौकातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांचे वरील हल्ला केल्याप्रकरणी आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.या पुढे जर ओबीसी नेत्यांच्या केसाला जर धक्का लावला तर सहन केले जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. व उपस्थित आंदोलकांनी हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

या वेळी विविध सामाजिक संघटना, महात्मा फुले जयंती उत्सव समिती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती ओबीसी संघर्ष समिती ,समता परिषद फलटण यांचा सक्रिय सहभाग होता.

आंदोलनकर्ते यांच्यामार्फत यावेळी पोलीस अधीक्षक राहुल धस व तहसीलदार अभिजित जाधव यांना निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!