हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

साठे-फाटा येथे नाकाबंदीत फलटण पोलिसांनी गोतस्करी करणारे वाहन पकडले

(जावली/ अजिंक्य आढाव)  सातारा जिल्हा मा. पोलीस अधीक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यास सक्त आदेश दिलेले आहेत की कोणत्याही प्रकारे गो हत्या साठी गो तस्करी होणार नाही यासाठी सतत कारवाया करून आरोपींवर कारवाई करा प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरपणे वागवण्याचा कायदा अनुसार होणारे करवाई ला अग्रक्रम देवून गुन्हे दाखल करा अशा सूचना आहेत.

या वाहनातून गोतस्करी करण्यात येत होती,सदर वाहनं पोलीसांच्या ताब्यात घेतले आहे.

या सूचनांच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विशेष नाकाबंदी सुरू केलेली आहे. बरड भागात या कायद्यान्वये कारवाईबाबत सतत फोन येत असतात त्या ठिकाणी रात्री साधे कपड्यांमध्ये नाकाबंदी लावण्यात आलेली होती. रात्री पहाटे साडेतीन वाजता साठे फाटा या ठिकाणी पिकप टेम्पो एम एच 10 ए क्यू 7950 या गाडीमध्ये पाच जर्सी गाय दाटीवाटीने क्रूर पने भरलेल्या होत्या. सदर गाई पाहता क्षणीच कत्तलीसाठी जात आहेत हे दिसून आले .त्या ठिकाणी चालक हर्षद जैनुद्दीन काजी वय २४ वर्षे राहणार नेवासे वस्ती बारामती व त्याला मदत करणारा अफ्ताब मुबारक पठाण वय 22 वर्ष मोरगाव रोड खंडोबा नगर या दोघांनाही पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. पाच जर्सी गाईंची त्या ठिकाणी तात्काळ सुटका करण्यात आली दोन लाखांच्या तस्करीसाठी जाणाऱ्या जर्सी गाई व वाहतूक करणारा चार लाखाचा वरील क्रमांकाचा टेम्पो पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींसह ताब्यात घेतला व दोन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात आणून त्यांना अटक करण्यात आली तसेच जर्सी गाई या राजाळे तील गो शाळेत सोडण्यात आल्या.

या नंतर अचानक पणे अशा नाकाबंदी लावून कारवाई करण्यात येणार आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार चांगण,  साबळे , अभंग , काकडे, सोमनाथ टिके यांनी केलेली आहे. पोलीस शिपाई सोमनाथ टिके यांनी सरकारतर्फे पोलीस ठाण्यास फिर्याद देऊन गुन्हा क्रमांक 1669 /23 प्राणी संरक्षण अधिनियम 1960 कलम पाच ए बी व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याचा अधिनियम कलम 11 तसेच वाहतूक कायद्याच्या कलमा प्रमाणे कारवाई केलेली आहे सदर आरोपींना पोलीस कोठडी रिमांडसाठी माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!