(फलटण/प्रतिनिधी ): सासकल ग्रामपंचायती च्या आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये श्री भैरवनाथ पॅनलचे राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. नऊ सदस्य असलेल्या सासकल ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास पॅनल ची सत्ता होती.त्यांचे पाच सदस्य तर श्री.भैरवनाथ पॅनलचे चार सदस्य होते. मात्र ग्रामविकास पॅनलचे उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे हे अपात्र झाल्याने रिक्त झालेल्या दुर्गादेवी वार्ड क्रमांक तीन मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील जागेवर ग्रामविकास पॅनलचे उमेदवार धनाजी दगडू घोरपडे यांचा पराभव करून श्री भैरवनाथ पॅनलचे उमेदवार प्रचंड बहुमताने राजेंद्र धोंडीबा घोरपडे हे निवडून आले होते. उपसरपंच पदासाठी साखर ग्रामविकास पॅनलच्या वतीने नीलम वैभव सावंत यांनी अर्ज भरला होता परंतु उपलब्ध संख्या व होणारा पराभव लक्षात घेता त्यांनी अर्ज माघारी घेतला.
या निवडीसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी एस के कुंभार हे निरीक्षक होते. यावेळी सासकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले, ग्रामसेवक अशोक मिंड यांनी निवडीची प्रक्रिया पार पाडली. त्यांच्या या निवडीबद्दल सासकल गावच्या विद्यमान सरपंच उषा राजेंद्र फुले यांनी राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांचे अभिनंदन केले आहे. सासकल गावचे माजी सरपंच हणमंत गंगाराम मुळीक, सोपान रामचंद्र मुळीक, लक्ष्मण गणपत मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक, ज्ञानेश्वर हरिबा मुळीक, ज्ञानेश्वर नरसिंग मुळीक, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी रमेश आड, चांगुणा सर्जेराव मुळीक, सोनाली मंगेश मदने, सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव मुळीक, विनायक मदने, बि डी घोरपडे, दिनेश दत्तात्रय मुळीक, कमलाकर आडके, अजित पोपट मुळीक, सर्जेराव मुळीक, महादेव फरांदे व ग्रामस्थांनी या निवडीबद्दल राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांचे अभिनंदन केले आहे.