हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

श्रीमंत रामराजे यांच्या प्रयत्नातून फलटण तालुक्यासाठी जलजीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ३५० कोटी रुपये- आ.दिपक चव्हाण

(फलटण /प्रतिनिधी)- फलटण तालुक्यातील अनेक गावांना निरा उजवा कालवा बंद झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत होती हे लक्षात घेऊन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील अनेक गावासाठी जलजीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून जवळपास ३५० कोटी रुपये आपल्या तालुक्यासाठी आणले असे प्रतिपादन फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण यांनी केले.

सस्तेवाडी तालुका फलटण येथील येथील जलजीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झालेल्या १४ कोटी ५० लाख या कामाचा शुभारंभ आज आ. दिपक चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये आमदार दिपक चव्हाण बोलत होते. याप्रसंगी फलटणमधील प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर, सस्तेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ.मनिषा चोरमले, सौ. उपसरपंच सुनिता वाबळे, शंकरशेठ जाधव, सस्तेवाडी तंटामुक्तीचे अध्यक्ष सतिशशेठ सस्ते, संजय जाधव, सस्तेवाडी सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर कदम, सस्तेवाडी ग्रामपंचायत माजी सरपंचसौ. प्रियांका सस्ते, संजय पवार इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पुढे आमदार दिपक चव्हाण म्हणाले की, जलजीवन मिशन योजनेचे मुख्य उद्देश हा होता की देशातील सर्व नागरिकांना घरोघरी नळ पाणीपुरवठा करणे या हेतूने चालू झालेली ही योजना या योजनेमध्ये 50 टक्के केंद्र सरकार व 50 टक्के राज्य सरकारचा वाटा असून आपल्या तालुक्यासाठी सस्तेवाडी सह अनेक गावांना या योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे.
राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारा निधी हा जिल्ह्यासाठी येत असतो आणि या निधीतून जास्तीत जास्त निधी आपल्या फलटण तालुक्याला कसा मिळेल या हेतूने आमदार श्रीमंत रामराजे यांनी विशेष प्रयत्न करून तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले आहे.

या योजनेला येत असणाऱ्या अडचणी म्हणजे प्रामुख्याने जागेची अडचण असेल अथवा गावांमधील काही लोकांचे अडचण असेल या सर्व अडचणी सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्यामुळेच या योजना मार्गी लागल्या असल्याचे सांगून दिपक चव्हाण म्हणतात की, या योजना मंजूर झाल्या त्यावेळी आम्ही सत्तेत होतो व आजही आम्ही सत्तेत आहोत या योजनेचे श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये या योजनेचे सर्व श्रेय श्रीमंत रामराजे यांचे असून या योजनेअंतर्गत होणारे काम नियमाप्रमाणे दर्जेदार व चांगले व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून या योजनेला कोणत्याही अडचणी येऊ देऊ नये यासाठी गावातील सर्व मंडळीने लक्ष देऊन तसेच सर्वांना विश्वासात घेऊन हे काम लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्यासाठी ठेकेदाराला सहकार्य करावे भविष्यात आपणाला पाण्याची तीव्र टंचाई भासणार असल्यामुळे आता आपणाला घरोघरी मीटर बसविण्याची गरज असून यामुळे सर्वच लोकांना याचा न्याय मिळेल जेवढे आपण पाणी वापरणार आहोत तेवढेच आपणाला मीटरचे भाडे द्यावे लागणार आहे.

नीरा उजवा कालवा बंद झाल्यानंतर जवळपास या गावाला दिड महिना पुरेल एवढे पाणी साठवण क्षमता या नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये असणार असल्याचे शेवटी आमदार दिपक चव्हाण यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यंवरांचे सत्कार व स्वागत उद्योजक राम निंबाळकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!