(जावली/ अजिंक्य आढाव) वातावरणातील बदलामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असताना आज फलटण पूर्व भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे.
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असुन ज्या वेळी आवश्यकता होती त्या वेळी मात्र पाऊसाने दांडी मारल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला होता. माञ आज पाऊसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान होणार असल्याची चर्चा होत आहे.यातच ऊसतोड मजुरांचे हाल होताना दिसत आहेत.
सध्या रब्बी हंगामात गहू ज्वारी कांदा ही प्रमुख पिके घेतली जातात या अवकाळी पावसामुळे नुकसानच होणार असल्याचे बोलले जात आहे.