हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई एटीएम मध्ये वृद्ध लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला दहिवडी पोलिसांनी मोठ्या शितापीने केली अटक

दीड महिना 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून घेतला शोध

(जावली/अजिंक्य आढाव) – वृद्ध नागरिकांना बँक, ATM मध्ये एकटे गाठून त्यांच्या वृद्धपणाचा , अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडील एटीएमची अदलाबदल करून खात्यातून पैसे काढणाऱ्या इसमास मोठ्या शीता फिने दीड महिना 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून, तसेच मान खटाव तालुक्यातील बँका आणि एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासून अटक करण्यात आली आहे.

गोंदवले – कासिम जंगुभाई शेख, वय( 68) वर्ष राहणार, तडवळे हे दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता बँक ऑफ इंडिया दहिवडी येथील एटीएम मध्ये पैसे काढण्याकरिता आलेले होते. यावेळी एक अनोळखी इसम तेथे आला आणि म्हणाला की माझ्या एटीएम मधून पैसे निघत नाहीत तुमच्या तरी निघतात का ते पहा.? त्यावर फिर्यादी यांनी त्यांचे एटीएम मशीन मध्ये टाकले.

त्यावेळी जवळच उभा असलेला संशयित आरोपी नामे प्रमोद सिताराम यलमर,राहणार कान्हरवाडी, तालुका खटाव ,जिल्हा सातारा, हा फिर्यादी यांना म्हणाला की पिन नंबर टाका आणि फिर्यादी यांनी पिन नंबर टाकल्यानंतर आरोपीने बॅलन्स बटन दाबले, त्यानंतर फिर्यादी यांनी याबाबत संशयित आरोपीला विचारणा केली असता त्यांनी चुकून बटन दाबले गेले असे म्हणाला.
याच वेळी त्यांनी फिर्यादी यांच्या एटीएम चा पासवर्ड पाहिला होता.

त्यानंतर आरोपीने फिर्यादीचे ATM मशीन मधून बाहेर काढून स्वतः जवळ असलेले त्याच बँकेचे ATM हातचालाकी करून आरोपीने फिर्यादींना देऊन या एटीएम मधून पैसे निघत नाहीत दुसरे एटीएम मधून पैसे काढा आणि थोड्याच वेळाने फिर्यादी यांच्या अकाउंट मधून पैसे कट झाल्याचा मेसेज फिर्यादी यांना आला. त्यावेळी त्यांना कळाले की आरोपीने त्यांचे एटीएम हातचलाकी करून घेऊन त्याच बँकेचे दुसऱ्या नावाचे ATM देऊन पैसे काढून फसवणूक केलेली आहे.

या अनुषंगाने दहिवडी पोलीस स्टेशनला पंधरा हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदर आरोपीचा दीड महिन्यापासून दहिवडी पोलीस शोध घेत होते.

या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, पोलीस हवालदार खांडेकर, महिला पोलीस नाईक रासकर पोलीस कॉन्स्टेबल कुदळे अशी सर्व टीम या आरोपीच्या शोधावर होती.

या आरोपीला पकडण्या करिता दहिवडी, म्हसवड , गोंदवले , वडूज मायनी अशा परिसरात जाऊन आरोपीचा शोध घेऊन शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तसेच माण, खटाव तालुक्यातील एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासून मोठ्या शीताफिने आरोपी नामे प्रमोद सीताराम यलमर, राहणार कान्हरवाडी, ता. खटाव जि. सातारा यास अटक केलेली आहे.

सदर आरोपीकडे अटक केल्यानंतर अधिक तपास केला असता या आरोपीने दहिवडी, वडूज ,म्हसवड गोंदवले अशा परिसरातून वृद्ध नागरिकांना हेरून ATM बदलून पैसे काढल्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपीकडे वेगवेगळ्या बँकांचे बरेचसे एटीएम सापडले असून या अनुषंगाने पुढील तपास पोलीस हवालदार खांडेकर हे करत आहेत.

सदरची कामगिरी दहिवडी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी म्हणून कामकाज सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे , पोलीस हवालदार बापू खांडेकर , महिला पोलीस नाईक नीलम रासकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण कुचेकर यांनी सहभाग घेतला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!