(फलटण/ प्रतिनिधी)-श्री. काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आसुच्या वतीने दिल्या जाणारा स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार 2023” नुकताच ज्येष्ठ लेखक ज.तु.गार्डे यांना प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शिवरुपराजे उर्फ बाळराजे खर्डेकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता, सुधीर इंगळे सर मा.प्राचार्य मुधोजी महाविद्यालय फलटण, पत्रकार प्रकाश सस्ते सर, हनुमंत चांदुगडे, स्वाती पाटील, जीवन इंगळे हे उपस्थित होते.
सदर पुरस्कार हुतात्मा राष्ट्र बंधू राजीव भाई दिक्षित यांच्या स्मरणार्थ स्वदेशी दिनादिवशी दिला जातो. सदर पुरस्कार हा ज. तु. गार्डे यांच्या घातपात या प्रसिद्ध. कादंबरीला मिळाला आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री गार्डे यांचे सामाजिक ,शैक्षणिक ,साहित्यिक क्षेत्रातून विशेष अभिनंदन होत आहे.