(जावली/अजिंक्य आढाव) कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी बरड ता. फलटण गावच्या हद्दीत पुणे पंढरपूर रोडवरील घोलप वस्ती येथे फलटण ग्रामीण पोलिसांनी टेम्पोंसह तीन जर्शी गाई असा 5 लाख 45 हजाराचा मुद्दे माल जप्त करुन संशयित चालक समाधान नाना थोरात वय (40) रा.अकोले बुद्रुक ता.माढा .जि. सोलापूर व सागर कबीर खंडागळे वय (29) रा.टेंभुर्णी ता.माढा जि. सोलापूर यांना ताब्यात घेतले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की दि.26 रोजी सकाळी 07.00 वा. चे सुमारास मौजे बरड ता. फलटण गावची हद्दीत घोलप वस्ती येथील पुणे ते पंढरपूर जाणारे रोडवर इसम नामे समाधान नाना थोरात वय (40) वर्षे व्यवसाय ड्रायव्हर राहणार अकोले बु ता माढा जि सोलापूर, सागर कबीर खंडागळे वय 29 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार टेंभुर्णी ता माढा जि सोलापूर हे त्यांचे ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा मालवाहतूक गाडी क्रमांक MH 45 AF 9069 या वाहनांमध्ये जर्सी जातीच्या तीन गाई क्रूरतेने वागणूक देऊन त्यांचे चारही पाय बांधून त्यांच्या चारा पाण्याची सोय न करता त्यांची पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडून वैद्यकीय तपासणी करून न घेता कत्तली साठी घेऊन जात असताना आढळून आले. या करती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक तपास पो. हवा. चांगण करत आहेत.