हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्या सोबतीने देऊर मधील नागरिकांशी साधला संवाद मतदार नोंदणी करण्याचे केले आवाहन

सातारा दि.24: सातारा जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहिम सुरु आहे. या अंतर्गत सर्व प्रशासकीय अधिकारी गावागावांमध्ये केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्या सोबत जावून मतदार नोंदणीसाठी जनजगृती करित आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही आज केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्या सोबत कोरेगाव तालुक्यातील देऊर गावातील घराघरांना भेटी देऊन ग्रामस्थांना आपण मतदार नोंदणी केली आहे का? केली नसल्यास 9 डिसेंबरपर्यंत नमुना क्र. 6 भरुन मतदार नोंदणी करा, आपले मतदान ओळखपत्र काढून घ्या, येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान करा आणि विश्वासातील सर्वात मोठ्या भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले.

यावेळी कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजीत नाईक, देऊरचे सरपंच शामराव कदम यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते.

मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये केंद्रीय मतदान अधिकारी यांच्यासोबत माझ्यासह महसूल विभागातील नायब तहसीलरांपर्यंत गावोगावी जावून सर्वजण मतदार नोंदणीचे काम करीत आहे. भारताची लोकशाही जगातील सर्वात बळकट व मोठी आहे. 18 ते 30 वयोगटातील मतदारांनी आपली नावे 9 डिसेंबरपर्यंत मतदार यादीत नोंदवून नमुना क्रमांक 6 द्यावा केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्याकडे भरुन द्यावा व मतदान ओळखपत्र काढून घ्यावे लोकशाही बळकटीकरणात सहभागत नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

देऊर गावातील शेतकऱ्यांशीही जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद देऊर भेटीदरम्यान गावातील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सेंद्रीय शेती ही आता काळाची गरज बनली आहे. सेंद्रीय उत्पादनांना बाजार पेठेत मोठी मागणी असून गट शेतीच्या माध्यमातून देऊर गावातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असेही आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!