गोखळी (प्रतिनिधी): फलटण -बारामती तालुक्यातील शहर आणि परीसरात बेघर, वंचित, उपेक्षित, निराधारांना आधार निवारा देण्यासाठी अहोरात्र मेहनत परिश्रम घेऊन आधार देणारे गोखळी येथील श्री राजेंद्र नारायण गावडे पाटील यांना कै.हरिभाऊ श्रीरंग जगताप विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मनोरुग्णांची सेवा व समाजकार्यासाठी केलेले कार्याची नोंद घेऊन गावडे आणि आसरा टिम सदस्यांना सन्मानचिन्ह देऊन जगताप परिवारा तर्फे त्यांचा विशेष सन्मान करून संपूर्ण आसरा टीमचे सहकारी अभिजीत नांगरे,हनुमंत खलाटे, राकेश चव्हाण यांचाही सन्मान करण्यात आला. राजेंद्र गावडे पाटील यांना कोठूनही फोन आला.आमच्या परीसरात वेडसर मनुष्य बेवारस मनोरुग्ण भटकत आहे. अंगावर कपडे आहेत नाहीत स्त्री पुरुष कोणीही असुद्या त्या ठिकाणी भेट देऊन संबंधित व्यक्तीला. स्वखर्चातून मनोरुगणास त्यांना त्यांच्या हक्काच्या ठिकाणी येऊन दाखल करणे. हे मोलाचे काम हे आसरा टीम करत आहे. हे त्यांच्या या कार्याच्या छोटासा आढावा म्हणून. संपूर्ण जगताप कुटुंबीय तर्फे त्यांचा स्वर्गीय हरीभाऊ जगताप विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.. या कार्यक्रमास अमित जगताप, हनुमंत जगताप, पिंटू जगताप, सचिन जगताप, पप्पू जगताप, सुप्रिया जगताप. उपस्थित होते. भविष्याच्या त्यांच्या वाटचालीस त्यांचे कार्य असंच चालू राहो व त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या मदतीलाआम्ही नेहमीच धावून येऊ असे जगताप कुटुंबियांच्या वतीने आश्वासन दिले.