हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

जावल सिद्धनाथ जन्मकाळा निमित्ताने सिद्धनाथ चषक चे दि.1 डिसेंबर रोजी पासुन आयोजन

(अजिंक्य आढाव/जावली) – जावल सिद्धनाथ जन्मकाळा निमित्ताने जावली गावात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चे आयोजन करण्यात येते ,  त्या बरोबरच दिनांक 1 डिसेंबर पासून सिद्धनाथ जन्मकाळा निमित्ताने भव्य टेनिस क्रिकेट बाॅल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या मध्ये 1) प्रथम 51 हजार रुपये व चषक,(मा.श्री.काशीनाथ शेवते राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश अध्यक्ष यांच्या वतीने)
2) द्वितीय 31 हजार व चषक(श्री. पोपट हरिभाऊ चवरे माजी.प्राचार्य विद्यामंदिर  प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला)
3)तृतीय 15 हजार रुपये व चषक (श्री.भरत विठ्ठलराव मोरे,पोलिस पाटील जावली)
4)चतुर्थी 11हजार व चषक (श्री.बाळासो भिकु पोकळे माजी सरपंच जावली ग्रामपंचायत)

स्पर्धेतील संघासाठी टी शर्ट सौजन्य
डॉ.अनिल बोराटे , रवींद्रायनमहा झेंडे सर धनंजय राऊत , विकास शिंदे, शिवाजी नाळे ( मिस्त्री)

स्पर्धेसाठी कै. सोमा धोंडी बरकडे प्रतिष्ठान व आसामा मिनी मार्केट व फुट वेअर यांच्यावतीने संयोजक व आयोजक यांना – टी शर्ट

या सामन्यासाठी आकर्षक बक्षीस वितरण करण्यात येणार असून मॅन ऑफ दि सिरीज – सुरेश बाबर सर यांच्या वतीने सासकल ,बेस्ट बॅटस मन साठी – बॅट , बेस्ट बाॅलरसाठी -नितीन गोफणे – शुज , या स्पर्धेसाठी बाॅल बॉक्स अतुल गोफणे यांच्या वतीने देण्यात येणारा असुन सामने युट्यूबवर SB Sports (सौजन्य – मेघराज मोरे ,बबलु रजपूत)चॅनेल वरती दाखवण्यात येणार आहेत.
सामान्याचे संयोजक अभिजित शिंदे, सुनील जाधव,शकील शेख,भाऊ झेंडे,आसिफ आतार

सर्व सामने जावली येथील फलटण शिखर शिंगणापूर रोड वरील हेकळवाडी रस्त्यालगत सेवागिरी मठ येथील मैदानावर होणार असून या साठी सौजन्य प्रतापसिंह रामचंद्र मोरे यांच्या वतीने लाभले आहे.

मागील वर्षीचा सिद्धनाथ चषकाचा मानकरी जानाई राजाळे ठरला होता यंदा कोण ठरणार सिद्धनाथ चषकाचा मानकरी उत्सुकता लागली असुन या सामन्यासाठी फलटण ,माण , माळशिरस, पुणे, मुंबई,दौंड , सातारा या ठिकाणचे संघ सहभागी होतात या मुळे परिसरातील क्रिकेट प्रेमीना उत्सुकता लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!