हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

निरगुडी येथील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थींची २८ वर्षांनी भरली शाळा

(राजाळे/ प्रतिनिधी)- निरगुडी ता.फलटण येथील जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथील सन १९९४/९५ च्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.त्या बरोबरच कै. समीर सस्ते यांच्या दोन मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच माजी विद्यार्थी पैकी अधिकारी वर्ग असणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सर्व उपस्थित माजी विद्यार्थींनी मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी सर्व आजी माजी विद्यार्थी, शिक्षक,जुना मित्रपरिवार असा स्नेह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!