हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

गोखळी ता. फलटण येथे किल्ला बनवा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

गोखळी ( प्रतिनिधी): प्रतिवर्षी प्रमाणे दिपावली सणाच्या निमित्ताने गोखळी (ता.फलटण) येथील किल्ला स्पर्धेमुळे परीसरात मध्ये शिवमय वातावरण निर्माण झाले होते भारतीय महिला सहकारी पतसंस्था गोखळी, माजी सरपंच नंदकुमार गावडे युवा मंच गोखळी आणि शिवसेना ठाकरे गट गोखळी यांच्या वतीने भव्य किल्ला बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते..उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवा पिढीला इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी त्यांच्या सुप्त कलागुणांना सादरीकरणात संधी मिळावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा अभ्यासपूर्ण इतिहास जपला जावा या हेतूने गोखळी आणि परीसरात येत्या दिवाळी सणाच्या निमित्ताने गडकिल्ल्यांची प्रतिकृती व देखावे उभारणे या स्पर्धेचे मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी गोखळी परीसरात आयोजन करण्यात आले आहे.

बालमावळ्यानी छत्रपती शिवरायांच्या स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करावा जेणेकरून युवा पिढीसमोर शिवरायांची फक्त युद्ध कलाच नाही तर त्यांनी बांधून घेतलेली गड किल्ले किती अभ्यासपूर्ण बांधले आहेत की शत्रू कितीही बलवान असला तरी शिवरायांचा एक साधा किल्ला सहज जिंकण्यासाठी मोठ्या ताकदीने लढले तरी पराभव स्वीकारावा लागत यावरुन छत्रपती शिवराय केवळ लढाया जिंकणारे राजे नव्हते तर जगातील सर्वोत्कृष्ट सिव्हिल इंजिनिअर व आर्किटेक्चर होते.म्हणून येत्या दिवाळीत शिवरायांच्या वैशिष्ट्ये पूर्ण पैलू युवा पिढीने अभ्यासावा म्हणून गडकिल्ल्यांच्या स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे.शिवसेना (ठाकरे गट ) गोखळी,भारती महिला सहकारी पतसंस्था गोखळी आणि माजी सरपंच नंदकुमार गावडे युवा मंच गोखळी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेस शिवप्रेमी बाल मावळ्यांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक रुपये १००१ यश अजित सुर्यवसे ( पन्हाळगड )व्दितीय क्रमांक. प्रत्यकी रुपये ५०१ विभागूनदेण्यात आला किलबिल ग्रुप ( राजगड) आणि शिवरुप विजयसिंह घाडगे, तृतीय क्रमांक प्रत्येकी रुपये ३०२ विभागून समृद्धी दत्तात्रय वनारसे (सर्वकिल्ले प्रतिकृती), आणि पसार्थक अमोल हरीहर ( अचानक किल्ला), थोटा गट रुपये ५०१उत्कृष्ट अवधूत अमित गावडे (विशाळगड), उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये २०१ वरद सोमनाथ वायसे ( राजगड ), कु.दिपाली शिवाजी मदने ( जंजिरा )आयुष विकास चव्हाण ( जंजिरा) यश सोमनाथ गेजगे या विजेत्या स्पर्धकांना एका समारंभात बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.परीक्षक म्हणून संजयकुमार बाचल, राजेंद्र भागवत, अमित धुमाळ यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!