हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

सुरवडीत अवैध बैलगाडा शर्यत भरवल्याप्रकरणी 15 जणां विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

(अजिंक्य आढाव /जावली) सुरवडी तालुका फलटण गावच्या हद्दीत दिनांक 17 रोजी बेकायदा कायदा बैलगाडा शर्यत भरवल्याप्रकरणी 15 जणांना विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरवडी गावच्या जवळ फलटण लोणंद रोडवरील कमिन्स कंपनीच्या पश्चिमेकडील मोकळ्या जागेत दिनांक 17 रोजी दुपारी 3 वाजता बैलगाडा शर्यत भरवत लंपी या संसर्गजन्य रोगाच्या प्रसार करण्यात कारणीभूत होणारी कृती करत तसेच बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक कोणतीच परवानगी न घेता बैलांचा छळ होईल अशी कृती केल्याबद्दल रवींद्र तायप्पा चौगुले , संभाजी बिराप्पा केंगार, तुषार सोमनाथ करे, सोनू दगडे, सुरेश बाळासाहेब जाधव, वैभव खंडेराव जाधव, स्वप्निल संजय जगदाळे , अजित मल्हारी जाधव , कोंडीराम बापू जावळे, सुहास रोहिदास जाधव , गणेश दत्तात्रय मदने, मंगेश बन्याबा जाधव, अविनाश दत्तात्रय जाधव , सागर काशिनाथ मदने व दादा मदने अशा 15 जणांनी विरोधात पोलीस कॉन्स्टेबल सुरज काकडे यांनी फिर्याद दाखल केली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील 15 जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!