हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

कत्तलीसाठी जाणारी तीन गोवंश व वाहतूक करणारा टेम्पो फलटण ग्रामीण पोलिसांकडून जप्त

(अजिंक्य आढाव/जावली) फलटण ग्रामीण पोलिसांना काल सायंकाळी नऊ वाजता दरम्यान बरड गावच्या हद्द्दी टाटा टेम्पो इंट्रा. MH 45 अफ7525 यामधून दोन गावरान गाई व एक जर्सी गाई ही कत्तलीसाठी घेऊन जात आहेत. अशी माहिती मिळाली तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडून पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पोलीस कर्मचारी मदने पोलीस शिपाई सावंत ढोले चतुरे पोलीस उपनिरीक्षक काटकर यांना त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यास सांगितले असता सदर जनावरे कत्तलीसाठीच जात आहेत अशी त्यांची खात्री झाल्याने 1 नवनाथ दुर्गाप्पा वाघमोडे वय 22 वर्ष राहणार माळशिरस ता. माळशिरस  हुसेन रामा वाघमोडे वय 46 वर्ष राहणार माळशिरस या दोघा वाहतूक करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रस्ता क्रमांक 1634/ 2023 कलम प्राणी संरक्षण अधिनियम पाच पाच ए नऊ तसेच प्राण्यांना छळवण्याचा अधिनियम कलम 11 प्रमाणे कारवाई करून जनावरे व शाळेत ठेवण्यात आलेली आहेत या कार्यामध्ये दोन लाख रुपयांचा टेम्पो व 75 हजार रुपयांची जनावरे जप्त करण्यात आलेली आहेत.

सदर आरोपींना दोन दिवस पोलीस कुठे घेऊन सदर जनावर कुठून खरेदी केली व कोणाला विकणार होती याबाबत अधिक तपास सुरू असून यापुढे जर या कार्यास सतत राहिल्या तर तडीपारी सारखी सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल पोलीस उपाधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!