(अजिंक्य आढाव/जावली)- फलटण पूर्व भागात जावली ता. फलटण येथे बदलत्या हवामानामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, या रोगांवरती प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी औषध फवारणी करण्यात यावी .
फलटण पूर्व भागात जावली गावांमध्ये व वाड्या वस्त्या वरील काही भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मलेरिया, डेंग्यू, गोचडी ताप या आजाराची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडूनही आरोग्य विभागाकडून कोणतीही दक्षता घेतली गेली नाही. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यू व मलेरिया इतर तत्सम आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. गावातील आजारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्ण सरकारी व फलटण ,बरड येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. अद्यापही या आजाराविषयी शासकीय यंत्रणा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडुन संबंधित आजारांविषयी फ्लेक्स, पत्रके, दवंडी, सूचना, जनजागृती, औषधे फवारणीसारखी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.औषध फवारणी करण्याची मागणी केली जात आहे.