(गोखळी/प्रतिनिधी)दुधेबावी ता. फलटण येथील जुन्या पिढीतील नामवंत पैलवान आणि शेतकरी पांडुरंग कोंडीबा सोनवलकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले.
सातारा जिल्हा प्रा. शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हा. चेअरमन व विद्यमान संचालक, दुधेबावी ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शशिकांत सोनवलकर आणि दुधेबावी/फलटण येथील प्रख्यात चार चाकी व दुचाकी मॅकेनिक बाजीराव सोनवलकर यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात पत्नी २ मुले, ३ मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.दुधेबावी येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून दुपारी ३.३० वाजता दुधेबावी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.