हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

पवार ,फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला – चंद्रकांत वाघमोडे पाटील

(गोखळी /प्रतिनिधी): – माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या जास्त आहे महादेव जानकर यांनी २००९ मध्ये या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला धनगर समाजाचा खासदार लोकसभेत जाईल या भिती पोटी शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला निवडून आल्यानंतर धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देऊ असे आश्वासन देऊन निवडून आल्यानंतरही धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोकसभेच्या.पटलावर एक शब्द ही काढला नाही धनगर समाजाचा विश्वासघात केला, धनगर समाजाच्या वतीने बारामती आंदोलन वेळी देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन उपोषण मागे आमचे सरकार सत्तेवर आले की लगेच धनगर.समाजाला आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले ते सत्तेवर येऊन सुध्दा त्यांनीही धनगर समाजाचा विश्वासघात असा आरोप धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आमरण उपोषणाचा बसलेले उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी केला.

महाराष्ट्रातील धनगर समाज मागील 70 वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे यासाठी अनेक आंदोलने मोर्चे आणि उपोषण झाली तरीसुद्धा सत्ताधारी राष्ट्रवादी , भाजप , काँग्रेस या राजकीय पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे हे सरकार सत्तेच्या बाहेर असते ती सरकार धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे म्हणते ते सरकार धनगर समाजाचे मतावर सत्तेत बसते तेव्हा ते सरकार मूक गिळून गप्प बसते यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे गेली दोन महिन्यापूर्वी चौंडी येथे उपोषणाला बसलेल्या समाजातील उपोषण करताना एसटी आरक्षणाची अंमलबजावणी 50 दिवसात करू अशी आश्वासन सरकारने दिले परंतु 40 दिवस उलटूनही. आजपर्यंत कुठल्याही प्रकारची सहकारी हालचाल दिसून येत नाही म्हणून ९ नोव्हेंबर पासून आपण बारामती प्रशासकीय भवन इमारती समोर सकल धनगर समाजाच्या वतीने प्राणांतिक उपोषण करीत असून जोपर्यंत धनगर समाजाला एस टी आरक्षणाची मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी बोलताना सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!