हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

२७ वर्षीय भारतीय नौदल विभागात काम करणारे बापूराव कापसे यांचा म्हसवड इंजबाव रोडवरील अपघातात मृत्यू

(म्हसवड /प्रतिनिधी) इंजबाव येथील २७ वर्षी बापूसाहेब तुकाराम कापसे हा मुंबई भारतीय नवदल सेनेत (नेव्ही)मध्ये नोकरी करत होते दोन दिवसापूर्वी दिपावली व पत्नीच्या डिलीवरीसाठी आपल्या इंजबाव या गावी आला असताना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता आई वडिलांना म्हणाला मी आर्धा तासात म्हसवडला जावून येतो म्हणून स्वताच्या सिलेरो या चार चाकी गाडीने म्हसवड इंजबाव रस्त्याने म्हसवडला येत असताना म्हसोबा मंदिरा नजिक बापूराव यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीने दोन तिन पलटी खावून रस्त्यापासून शंभर फुट बाजूला गेल्याने अपघातात होऊन बापूराव कापसे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघड झाली बापूराव यांच्या आकस्मित अपघाती मृत्यूने इंजबाव व सासूरवाडी असलेल्या वरकुटे म्हसवड या ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे

अपघातात गाडी चा चक्काचूर झालेल्या अवस्थेत

याबाबत पोलिस स्टेशन मधून मिळालेली माहिती या प्रमाणे इंजबाव येथील तुकाराम कापसे यांचा बापूराव हा मुलगा मुंबई येथे भारतीय नवदल विभागात काम करत होता गेल्या दिड वर्षापूर्वी वरकुटे म्हसवड येथील स्वाती हिच्या बरोबर बापूराव यांच्या विवाह झाला होता स्वाती हि मुंबई पोलिस मध्ये काम करत असून स्वाती हिला दिवस गेल्याने तीला वरकुटे म्हसवड येथे माहेरी दिपावली व डिलीवरी साठी ठेवायचे व आपन हि दिपावली करून कामाव जायाचे म्हणून सिलेरो या कार क्र एम.एच १४ सी ५२७२५ ही घेवून सोमवारी मुंबई वरुन इंजबाव येथे आले होते मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी म्हसवड येथील डॉ गायकवाड यांच्या दवाखान्यात पत्नी स्वाती हिस रुटींग तपासणी साठी नेमले होते डॉ गायकवाड यांनी १८ तारीख डिलीवरीची सांगितली होती त्यामुळे बापूराव यांनी आपली पत्नी हिस माहेरी वरकुटे म्हसवड येथे सोडून इंजबाव येथे आपल्या घरी आले होते बुधवारी दिवसभर गावात व घरीच बापूराव होता रात्री जेवन करून गप्पा मारल्या व झोपण्यास निघालो त्यावेळी माझा मुलगा बापुसाहेब हा मला म्हणाला मी अर्ध्या तासात जावुन परत माघारी येतो असे म्हणुन घरातुन त्याची कार क्र MH14C52725 मधुन निघुन गेला
होता गुरुवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी बापूराव यांचे चुलते व त्यांची पत्नी जनावरांची धार काढत असताना रोजीसकाळी 06 वा चे सुमारास मी गुरांचे धारा काढत असताना मला आमचे गावातील रामचंद्र रंगनाथ डिसले याचा फोन आला की तुमचा चुलत पुतण्या बापुसाहेब तुकाराम कापसे याचा म्हसवड गावचे हद्दीतील म्हसोबा मंदीराचे जवळ म्हसवड ते इंजबाव जाणारे डांबरी रोडला अपघात झाला आहे असे सांगितल्यावर मी माझे चुलत भावजय कल्पना हीचे कडे बापूराव कुठे आहे असे म्हटल्यावर त्या म्हणाल्या रात्री ११ वाजता बापुसाहेब हा मला म्हणाला की मी अर्ध्या तासात जावुन परत माघारी येतो असे म्हणुन घरातुन त्याची कार क्र MH14 CS 2725 मधुन निघुन गेला तो परत आला नाही असे सांगितल्यावर मी आमचे भावकीतील नितीन शामराव कापसे, गोरख भिमराव कापसे, पांडुरंग हरी कापसे असे आम्ही मोटारसायकल वरुन अपघात झाले ठिकाणी आलो, तेव्हा सदरचा अपघात हा इंजबाव ते म्हसवड जाणारे डांबरी रोडला झाला असुन सदर ठिकाणची पाहणी केली असता आम्हाला असे दिसुन आले की, माझा पुतण्या बापुसाहेब हा त्याची कार क्र MH14 CS 2725 मधुन इंजबाव बाजुकडुन म्हसवड बाजुकडे येत असताना त्याची कार रस्त्यावरुन खाली रस्त्याचे डावे बाजुला नाल्यात जावुन धडकुन लांबवर जावुन अपघात झाला आहे व झाले अपघातामध्ये माझा पुतण्या बापुसाहेब तुकाराम कापसे वय 27 वर्षे रा. इंजबाव ता.माण जि. सातारा हा जागीच मयत झाला असल्याची तक्रारतक्रार चुलते बाळू बाबा कापसे यांनी म्हसवड पोलिस स्टेशनला दिली असून अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ करत आहेत.

बापूराव कापसे आर्धा तासात येतो म्हणून नक्की कोठे गेला होता ? म्हसवड इंजबाव रस्ता सरळ पण खड्याचा डांबरी नावाला डांबर पूर्ण निघून खड्डे खडे रस्त्यावर पडल्याने तर अपघात झाला नाही ? कि समोरुन आलेल्या वाहनाला वाचवताना गाडीचा ताबा सुटून गाडी शंभर फुट रस्ता सोडून गेली कसी ? सरळ रस्त्यावर गाडीच्या पलट्या कशा होऊ शकतात असे एक ना अनेक प्रश्न या अपघाता निमित्ताने उपस्थित होत आहेत

1) पंधरा दिवसांनी स्वाती व मयत बापूराव यांचे येणार्या बाळाच्या आधीच बाळाच्या वडिलांचा अपघात झाल्याने जन्माधिच बाळ वडिलांच्या प्रेमाला पोरके झाले असून पती गेल्याचा मोठा धक्का पत्नीला बसला असून

2)म्हसवड इंजबाव या डांबरी रस्त्यावरील पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्याने घेतला बळी आजून बांधकाम विभागाला किती बळी पाहिजेत, इंजबाव म्हसवड हा रस्ता दुरुस्ती मंजूर असताना एका तालुकास्तरीय नेत्याने या रस्त्याला स्थगिती घेतल्याची चर्चा या अपघाताने होऊ लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!