हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

फलटण पूर्व भागात वसुबारस उत्साहाने साजरी

(गोखळी/प्रतिनिधी): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील खटकेवस्ती गोखळी गवळीनगर परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही वसुबारस उत्साहाने साजरी करण्यात आली.खटकेवस्ती पासून गवळीनगर,गोखळीपाटी येथून देशी गायींची गावातून मिरवणूकीने ग्रामदैवत दक्षिण मुखी हनुमान मंदीरासमोर पूजन करण्यात आले मिरवणुकीमध्ये ठिकठिकाणी सुवासिनींनी गायींना नैवेद्य दाखवून पूजन केले.वसु म्हणजे द्रव्य ,अर्धात धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे व्दादशी म्हणून या दिवसाला ‘गोवत्स व्दादशी ‘असे म्हणतात.

पाडसासह धेनू ही समृध्दता आणि सफलतेचे प्रतिक आहे पारंपारिक पद्धतीने सवत्स गायीची पूजा आपला आदरभाव व्यक्त केला जातो.या निमित्ताने गोवत्सव्दादशी म्हणजे गायी गुरांबद्दल . कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस दिवसांदिवस. देशी गायींची संख्या कमी होत आहे जनतेमध्ये देशी गोसवर्धन त्याची वैशिष्ट्ये याचा जास्तीतजास्त लोकांपर्यंत प्रसार होणे गरजेचे आहे असे वस्ताद पै.अनिल गावडे यांनी सांगितले.गेल्या अनेक दिवसांपासून आपण गोखळी आणि परीसरात वसुबारस निमित्ताने पारंपरिक वाद्यांच्या गजरात देशी गायींची मिरवणूक काढण्यात येते या कार्यक्रमाला खटकेवस्ती, गवळीनगर गोखळीपाटी , गोखळी येथील ग्रामस्थ आणि जय हनुमान तालिम संघाची पैलवान आपल्या गायी वासरे घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी होतात खटकेवस्ती येथे गायींना नैवेद्य दाखवून पुजन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वस्ताद पै अनिल गावडे, बबलू गावडे,गोखळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सखाराम जगताप,सौ.शालन अनिल गावडे,धनश्री गावडे,पै चेतन गावडे, बापूराव माळवे,रोहन गावडे, केशव गावडे, मुन्ना गावडे.आणि हनुमान तालिम. संघ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!