हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मिरगाव येथे युवा कीर्तन सप्ताहचे आयोजन

गोखळी (प्रतिनिधी) : – मिरगाव ता. फलटण येथील समता विकास प्रतिष्ठान व इंचगिरी रसाळ संप्रदाय गुरुभक्त भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “दिपावली” निमित्त दि.८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान युवा कीर्तन सप्ताह व सामुदायिक गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन सरक यांनी दिली.

सप्ताहात अनुक्रमे ह. भ.प. प्रणालीताई महाराज जाधव (वाल्हे ता. पुरंदर), ह.भ.प. नवनाथ महाराज कोलवडकर(दालवडी), राहुल महाराज बाबर(सातारा), ह.भ.प. योगेश महाराज यादव (सोळशी ता. कोरेगाव) यांची कीर्तने होतील. दि. १२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. गोरख महाराज कुंभार (संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था, हणमंतवाडी) यांचे काल्याचे कीर्तन होईल.

दि. ९, रोजी रात्री ९.३० वा. स.स. सिध्दरामेश्वर महाराज पाथरीकर यांची पुण्यतिथी साजरी होईल. दि. १०, रोजी ह.भ.प. शिवाजी महाराज शेळके(बारामती) यांचा एकपात्री भारुडाचा कार्यक्रम होईल. दि. १०, रोजी कीर्तन संपल्यानंतर दिवंगत ह.भ.प. हणमंत महाराज सरक व दादू महाराज विरकर यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम होणार आहे.. दि. ११, रोजी कीर्तन संपल्यानंतर दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. ११, रोजी दुपारी ४ वा. भव्य दिंडी प्रदक्षिणा होईल. दि. १२, रोजी काल्याचा महाप्रसाद श्री. वसंत कर्वे व श्री. प्रविण फरांदे यांच्या वतीने होणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी सौजन्य म्हणून श्री. बापुराव सरक, संपत पडारे, सोनाली धायगुडे, रुपाली ठोंबरे, बाबुराव सरक, आप्पा सरक, नवनाथ वाघमोडे भानुदास सरक व सुर्यकांत सरक यांचे सहकार्य लाभले आहे.

“एकच ध्यास व्यसनमुक्तीचा” हे ब्रिद उराशी बाळगून समाजातील व्यसनाधिनतेचे समुळ उच्चाटन, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, सामाजिक समता तसेच संत आणि समाजसुधारक यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम मारुती मंदिर या ठिकाणी होतील.

दि. ८ ते ११ दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला, रांगोळी आदी स्पर्धा व समाजप्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दि. १२, रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल.

सप्ताहात पहाटे ४ ते ६ काकड आरती , ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ गाथा पारायण, सायं. ६ ते ७ हरिपाठ व नित्यपाठ, रात्री. ९ ते ११ कीर्तन व नंतर समाज प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सोमा तात्या सरक , ह.भ.प. वसंत महाराज सरक, ह.भ.प. जालिंदर महाराज वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव सरक, सतिश सरक, उत्तम सरक, पोपट सरक, नंदकुमार सरक, आप्पा सरक, ज्ञानेश्वर सरक, किरण सरक, भरत सरक, सुखदेव सरक आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!