हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

प्रकल्पातून दोन वेळा आवर्तन केली म्हणजे माणचा दुष्काळ संपला हा जावाई शोध लागणार्या महा मदत सर्वेक्षण संस्थेचे डोके ठिकाणावर आहे का..?

(एल के सरतापे / म्हसवड) : – महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती व कमी पाऊस झालेल्या भागातील सर्वेक्षण करण्याचा ठेका महाराष्ट्र शासनाने ” महा मदत ” या संस्थेला दिला होता त्या संस्थेने दुष्काळी भागाचा सर्वे करून महाराष्ट्र सरकारला दिला व सरकारने परवा ४० दुष्काळी तालुके जाहीर केली ज्या तालुक्यात चार चार साखर कारखाने आहेत, ज्या गावात कॅनॅल दिवस रात्र वाहतो, इतर कारखाने, औद्योगिक वसाहती आहेत ते तालुके”महा मदत” या सर्वे करणार्या संस्थेने दुष्काळी गावे जाहीर केली मात्र ज्या माण मध्ये पिढ्यानपिढ्या पिण्याच्या पाण्याची तहान टॅक्सी वर भागवतो , जनावरांना व माणसांना पाणी विकत घ्यावे लागते, कमी पाऊस पडत असल्याने नऊ महिने आपली बायका पोरे व मेंढर घेऊन या कारखानदारांच्या वन वन जनावरे घेऊन फिरतो, सहा सहा महिने ऊस तोडणी, माती काम, रंगारी म्हणून कामाला जातो अशा माण तालुक्याला आज हि ३९ टँकरने पाणी टंचाई गावांत पुरवठा सुरू आहे तालुक्यातील १० तलावा पैकी ३ तलावात मृतसाठा अशी भयान परिस्थिती असताना माण सदन तालुका म्हणून ज्या” महा मदत” सर्वेक्षण संस्थेने जाहिर केला त्या संस्थेचे डोके ठिकाणावर आहे का? मुख्यमंत्री यांना स्वताच्या जिल्ह्यातील दुष्काळ तालुका माहित नाही त्या सरकारचं डोक फिरलंय का माण सदन तालुक्यात कोणत्या निकषावर बसवला असा सवाल दुष्काळी जनता करत आहे.

पाणी भरण्यासाठी टॅंकरची लाईन

ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान आहेत ते सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांना जिल्ह्यातील पाऊस कोठे पडतो कोठे पडत नाही हि परिस्थिती माहित अवगत नसने खेदाची गोष्ट ज्या जिल्ह्यात राहतात त्या पूर्वीकडील कायम दुष्काळी तालुका म्हणून माणकडे महाराष्ट्र पाहतो तर मुख्यमंत्री शिंदे राहतात त्या पश्चिमेकडील भागात सर्वत जास्त पावसाची नोंद महाबळेश्वर, पाचगणी, वाई,पाटण, सातारा या भागाची होते हि दोन विदारक चित्र मुख्यमंत्री पालकमंत्री त्याच प्रमाणे माण खटावचे जल नायक म्हणून उपाधी लावणारे आ. जया भाऊ यांच्या मतदारसंघ दुष्काळी यादीत नाही हे त्यांना त्या समितीने का सांगितले नाही महा मदत ह्या संस्थेने आॅफिस मध्ये बसू सर्वे केला का ? जल नायक भाऊनी उरमोडी, जिहे कटापूर, तारळी, टेंभू या योजनेचे पाणी माण मधे आणल्याने दुष्काळ गेला असा उंटावर बसू सर्वे महा मदत ने केला का आज हि जिल्ह्याच्या भागातील नद्या ओढे, बंधारे , धरणे भरलेली आहेत तर दुसरीकडे शेतकरी राजा पाऊस कधी पडतोय, पेरा केलेल्या पिकांना जिवदान मिळतंय कधी, विहिरला कधी पाणी फुटतंय,जनावरांना खायला कधी चार येतोय, यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे माण तालुक्याचा दुष्काळ हां माणदेशीच्या पाचवीलाच पूजलेला. पिण्याचे पाणी विकत शेतीला पाणी टॅकरने ऐवढेच काय जनावरांना हि पाणी विकत पाजणारा एकमेव माण तालुका असेल अशा या माण तालुक्याने पाण्याची कमतरता म्हणून कधी ही माणदेशी माणुस रडत बसला नहीं वा इतर कोणता हि विचार डोक्यात न देता माणदेशी माणसाने शिक्षणाला प्राधान्य देणार्या माणदेशी माणसाने शिक्षण घेऊन अटकेपार झेंडे फडवले हि दुरदुर्ष्टी ठेवूनच दुष्काळी माणदेशी माणसाने दगडाला हि टकरा देवून पाणी काढणारा माणदेशीने वेगळा विचार कधी केला नाही उरमोडी, जिहे कटापूर व टेंभू या प्रकल्पातून माण तालुक्याच्या काही भागातील शेतकरी यांनी पाणी सोडण्यासाठी लागणारा विज बिलाचे लाखो रुपये जलसंपदा विभागाला जमा केल्यावर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन दोन महिन्यापूर्वी केले होते.

त्यासाठी हि आ जयकुमार गोरे , युवराज सुर्यवंशी, प्रभाकर देशमुख यांनी प्रयत्न केले होते त्यामुळे पाणी टंचाई कमी प्रमाण झाले म्हणजे दुष्काळ माणचा संपला असा जावाई शोध लावणार्या महा मदत सर्वेक्षण संस्थेचे डोके ठिकाणावर आहे का ❓असा सवाल माणवासीय करत आहेत.

वाळलेला चारा पाऊस नसल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान

महा मदत दुष्काळाचा सर्वे करणार्या संस्थेचे डोके ठिकाणावर आहे का❓

पाऊसाच्या प्रतिक्षेत असलेली जमीन

माण तालुक्यांमध्ये जून महिन्यापासून पाऊस पाण्याअभावी पिके जळून गेली आहेत. पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे तर काही ठिकाणी पाऊसच पडला नसल्याचे वास्तव आहे. चाऱ्यासाठी गुराढोरांचे स्थलांतर झाले आहे.

माण गंगा नदीचे कोरडे पडलेले पात्र

चाऱ्याचा दर गगनाला भिडला आहे , ३९ टॅंकरने ४७,८९१ हजार नागरीकांना तर ५३,०७४ हजार जनावरांना पाणी पुरवठा होत आहे १५ विहीर अधिग्रहण केल्या आहेत तरी हि माण दुष्काळी यादीत माण तालुका नाही हा जावई शोध नक्की कोणाचा , महा मदत सर्वेचा, शासनाचा कि अन्य कोणाचा

४७,८९१ हजार नागरिक, ५३,०७४ जनावरे टॅकरच्या पाण्यावर माण तालुक्यातील ३१ गावांतील २२८ वाड्यावस्त्यांवरील एकूण ४७,८९१ हजार लोकसंख्या बाधित आहे, तर ५३,०७४ हजार पशुधन बाधित आहे. पाणीपुरवठ्यासाठी ८० खेपा मंजूर असून, एकूण ३९ टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १५ विहिरी / विंधन विहिरी अधिग्रहित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!