(जावली/अजिंक्य आढाव) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जावली ता.फलटण येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जावली गावात राजकीय पुढाऱ्यांना आता गाव बंदी चा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा सामाज्याचा वतीने सर्व पक्षीय आमदार , खासदार, तसेच राजकीय नेत्यांना गाव बंदी व जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दि.2 रोजी जावली ता.फलटण येथील झालेल्या बैठकीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गा मधून आरक्षणाची गरज असुन वेळोवेळी आंदोलन व निवेदन देऊन सुद्धा सरकारने आरक्षण दिलं नसल्याने जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जावली गावात सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येत असून इथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार करण्यात आला.
या वेळी मराठा सकल समितीचे सदस्य बापू निंबाळकर, सुयोग मोरे ,राजु मोरे ,पंकज मोरे, राहुल निंबाळकर, संग्राम बरकडे, निलेश कुचेकर , दादा बाबर ,अभिजीत हुंबे ,मच्छिंद्र निंबाळकर ,दशरथ निंबाळकर, मोहन मकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.