हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

बसची काच फोडलेला प्रकार वगळता ; माण मध्ये मुंडण करुन बंद शांततेत, शालेय विद्यार्थी हि उतरले आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर

(म्हसवड / प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या अमरावती उपोषणाला पाठिंबा म्हणून आज माण तालुक्यात किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला गोंदवले येथे मुक्कामी असलेली बसच्या काचा फोडण्यात आल्या, तर मार्डी, गोंदवले येथील उपोषणकर्ते यांनी मुंडण केले, तर दहिवडी महात्मा गांधीं विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर रस्त्यावर येवून आरक्षणाच्या घोषणा देत आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण घेतल्याशिवाय शाळेत जाणार नाही वा परिक्षा हि देणार नाही अशा घोषणा देत आंदोलन केले तर माण तालुक्यात सर्वत्र बंद पाळून जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला.

मुंडण करत आंदोलनस पाठिंबा

मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले दुसऱ्या टप्प्यातील मनोज जरांगे यांचे सुरु असलेल्या सातव्या दिवशीच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज मंगळवारी मराठा मोर्चाचे समन्वयक यांनी बंदची हाक दिली या बंदीच्या हाकेला अत्यावश्यक सेवा वगळता माण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला शाळा काॅलेज, एसटी बस वाहतूक, वडाप व व्यावसायिक यांनी आपले व्यावसाय, दुकाने बंद ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत शांततेत आज बंद पाळण्यात आला
दहिवडी येथील महात्मा गांधीं विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणा साठी चक्क शाळेच्या गेट समोरील रस्त्यावरच ठिय्या धरत आंदोलन केले महाराष्ट्रातील शालेय मुलांनी केलेले आरक्षणाच्या मागणीचे हे पहिलच आंदोलन असेल या आंदोलनात पाचवी ते दहावीची शेकडो मुले या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले, होते तर मराठा समाजाला कुणबी सरसकाट आरक्षण द्यावे या मागणीसाठी माण तालुक्यातील प्रत्येक गावात नेते पुढारी, आमदार, खासदार यांना गाव बंदी करुन साखळी उपोषणे आज चार दिवसापासून सुरू आसुन परवा इंजबावकरांनी मुंडण करुन केस व बांगड्यांचा आहेर रसकारलापाठवला होता आज मार्डी येथील तरुणांनी मुंडण करुन मार्डी बंद पाळले तर गोंदवले येथे हि मराठा तरुणांनी व वयस्कर वृध्द मंडळीनी आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत मुंडण केले.

म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत म्हसवड, वरकुटे मलवडी, हिंगणी, कारखेल, दिवड, वडजल, कुकूडवाड , मोही आदी ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी बंद पाळला होता. म्हसवड भागात म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ, पीएस आय रवि डोईफोडे, पीएस आय वाघमोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत चोख बंदोबस्त ठेवला होता.

शालेय विद्यार्थ्यां आरक्षण पाठिंबा देण्यासाठी

तर दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता एकुणच एक प्रकार वगळता माण तालुक्यात आजचा बंद शांततेत झाला.

म्हसवड मध्येआज रात्री सात वाजता कॅडल मार्च काढण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!