महाराष्ट्र
म्हसवड कॉरिडॉर भूसंपादनास शेतकऱ्यांकडुन विरोध करत विजेचा खांबावर चढत आत्महत्येचा प्रयत्न , म्हसवड पोलिसांची आंदोलकांना धरपकड
(म्हसवड / प्रतिनिधी) म्हसवड धुळदेव,मासाळवाडी , रुपनवरवस्ती मासाळवाडी परिसरातील शेकडो भुमिपुत्रांंचा म्हसवड येथे होत असलेल्या कॉरिडॉरच्या भुसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांनी आज भूसंपादन अधिकारी व म्हसवड सर्कल व इतर चार तलाठी मोजणी करुन जमिनी ताब्यात घेणार होते त्याला या भागातील शेतकर्यानी मोठा विरोध करत साईटच्या खांबावर चढून भूसंपादनाची विरोध करत आत्महत्येचा प्रयत्न केल्या नंतर पोलीसांनी आंदोलकांची धरपकड करत पोलिस ठाण्यात आणुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी म्हसवड सर्कल शेंडेयांनी गुन्हा दाखल करून मोजणी सुरू ठेवली असल्याचे सांगितले.
म्हसवड काॅरिडाॅर या औद्योगिक वसाहतीला लागणारी जमीनी देण्यास या परिसरातील शेतकरी यांनी कडाडून विरोध केला असून या काॅरिडाॅर मुळे आम्ही बेघर होणार आहे आमचे बागायत क्षेत्र कवडी मोलदराने घेऊन आम्हाला आमच्याच जागेतून बाहेर काढले जाणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत जमिनी एम आय डी सी ला देणार नाही वेळप्रसंगी मरण पतकरु पण जमिनी देणार नाही हा पवित्रा या भागातील शेतकरी वर्गानी घेत तिन वेळा आलेली मोजणी माघारी पाठवली होती आज मात्र उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार विकास अहिर यांना लेखी आदेश काढले होते तहसीलदार विकास अहिर यांनी मोजणी अधिकारी भुमिअभिलेखाचे अधिकारी यांचे बरोबर म्हसवड तलाठी कार्यालयातील मंडल अधिकारी शेंडे, तलाठी उत्तम अकडमल, विरकरवाडी, मासाळवाडी तलाठी गुलाब उगलमोगले, धुळदेव तलाठी प्रविण जामनेर, हिंगणी तलाठी मालोजी भोसले, व पुळकोटी तलाठी बी के वाघमारे यांना सदर जागेवर मोजणी होई पर्यंत थांबण्याबाबत आदेश काढले होते त्याप्रमाणे आज दुपारी तिन वाजता म्हसवड पोलिस स्टेशनचा फौजफाटा घेऊन म्हसवड माळशिरस रस्त्यापासून मोजणी करण्यासाठी आले असताना या भुसंपादनास विरोध करण्यासाठी शेकडो या भागातील शेतकरी जमा झाले होते एक शेतकरी अचानक साईटच्या खांबावर चढून मोजणी थांबवा, माघारी जा नाही तर विज वाहक तारेला मी हात लावून आत्महत्या करीन असे म्हणत होता पोलिस व अधिकारी यांना माघारी जा असे म्हणत होता.
त्यावेळी म्हसवड पोलिस ठाण्याचे अधिकारी राजकुमार भुजबळ म्हणाले मोजणी थांबवतो खाली उतरा असे म्हटल्यावर पाऊस तासाच्या गोंधळा नंतर साईटच्या खांबावरुन आंदोलनकर्ते खाली उतरल्यावर पोलिसांनी आंदोलन करणार्यांची धरपकड करुन पोलिस ठाण्यात आणले व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी १७ शेतकर्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आक्रमक झालेले शेतकरी यांचा पवित्रा पहात आजच्या मोजणीचे कामकाज थांबवण्यात आले
विलास रुपनवर शेतकरी
आतापर्यंत या कॉरिडॉरला स्थानिक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दोन शेतकरी लाईटच्या खांबावर चढून शोले स्टाईल भुसंपादनास विरोध केला. यावेळी पोलीस प्रशासनाकडून बळाचा वापर करून आंदोलनकर्ते यांना ताब्यात घेतले असले तरी आम्ही मरण पतकरु पण जमिनी देणार नाही असे म्हणाले