(जावली/ अजिंक्य आढाव)मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनास सातारा जिल्ह्यातुन पाठिंबा वाढला आहे.आरक्षणाच्या मुद्दा पेटु लागल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सातारा बंदची हाक दिली आहे.त्यात फलटण बंदची हाक मराठा समन्वयकांनी दिले आहे.
नागरिक , व्यवसायिकांनी बंदच्या हाकेला प्रतिसाद देण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे.दरम्यान तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण व आमरण उपोषण सुरूच राहणार आहे.
आतंरवाली सराटी( जि.जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे – पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे.याबाबत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने गावोगावी, पदयात्रा,कॅडल मार्च, काढण्यात येत आहे, मराठा समाजाच्या आरक्षणला सर्वच समाज घटकातुन उत्सफुर्त पाठिंबा मिळत आहे. सोमवारी सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनी जाहीर समर्थन केले.
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून याच्या अंमलबजावणी सातारा येथे केली जाणार आहे.उद्या दि. ३१रोजी सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून फलटण मधील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद मधे सामील व्हावे आणि बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन करण्यात आले आहे.सकाळी ८ वा तहसील कार्यालय फलटण येथुन बाईक रॅली निघणार आहे . तरी तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा समन्वयकांच्या वतीने करण्यात आले आहे