(कोळकी/प्रतिनिधी )- साँफ्ट टेनिस जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तरेश्वर विद्यालयाचे उज्वल यश संपादन करुन कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाहू क्रिडा संकुल सातारा येथे १४ ते १७ वयोगटातील मुलांची जिल्हा क्रीडा स्पर्धेत साँफ्ट टेनिस या खेळा मध्ये
महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे उत्तरेश्वर हायस्कूल व ज्यु. कॉलेज विडणी मधील १४ व १७ वर्षाखालील वयोगटांमध्ये निवड झालेले
मुले – 1) सत्यजित महादेव सूळ
2) ओम शिवाजी कोकरे
मुली – 1) सायली महादेव सूळ
2) स्मिता संतोष पवार
3) समीक्षा बाबुराव वाघमारे
मुले – 1) आदित्य श्रीकांत नाळे
मुली – 1) श्रेया राजेंद्र शेंडे
2) त्रिशला राजेंद्र बुरूंगले
या आठ मुलांनी जिल्हास्तरावर उज्वल संपादन करून कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे ही विभागीय स्पर्धा सांगली येथे होणार आहे.क्रिडा शिक्षक काशिनाथ सोनवलकर यांनी मार्गदर्शन केले.
उत्तरेश्वर हायस्कूल व ज्यु.कॉलेज मुलांनी मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल संस्थेचे सचिव सहदेव शेंडे अध्यक्ष दिलीपराव अभंग व संचालक राजेंद्र शेंडे व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी शिर्के सर्व शिक्षक वर्ग व पालक वर्ग यांनी कौतुक केले आहे.
उत्तरेश्वर विद्यालयातील ग्रामीण भागातील मुले बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासासाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेत जिल्हासह राज्यपातळीवर चमकू लागली आहेत ही अभिमानाची बाब असून मुलांना मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक काशिनाथ सोनवलकर यांनी घेतलेले कष्ट देखील मोलाचे असून संस्था मुलांना क्रिडा स्पर्धत पारंगत होण्यासाठी कायम सहकार्य राहील असे संस्थेचे सचिव सहदेव शेंडे यांनी सांगितले.