(जावली/अजिंक्य आढाव) – अत्यंत कठीण समजली जाणारी व खडतर असणारी ही स्पर्धा ओळखली जाते.
पोहणे , सायकलिंग करणे रनिंग अशा प्रकारे स्पर्धा घेतल्या जातात.समुद्रात दोन किलोमीटर पुणे त्यानंतर 90 किलोमीटर सायकल चालवणे तसेच 21 किलोमीटर रनिंग अशा स्वरूपामध्ये स्पर्धा होत असते यामध्ये जगातील 35 देशातील जवळपास बाराशे स्पर्धक सहभागी झाले होते यात फलटणचे श्री प्रशांत जाधव यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये श्री प्रशांत जाधव यांनी 8 तास 40 मिनिटे होती , माञ 7 तास 34मिनिटात स्पर्धा पूर्ण करत आपले नाव सुवर्ण अक्षरांमध्ये नोंदले आहे.
श्री जाधव हे सध्या जलसंपदा विभागात सातारा या ठिकाणी कार्यरत असून त्यांना व्यायामाची आवड असल्यामुळे त्यांना डॉक्टर प्रणील गोटे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत उत्तम यश मिळवल्याबद्दल ईडन गार्डन हेल्थ सेंटर व राजकीय सामाजिक अशा विविध क्षेत्रातून त्यांना गुणगौरव केला जात आहे.