(जावली अजिंक्य आढाव) सुरूपखानवाडी येथील राहणारे राहुल संजय लोखंडे हे ऑनलाइन सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालवतात , दिनांक 24 ते 26 /10 /23 या कालावधीत त्यांचे सरकार सेवा केंद्र हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून सेवा केंद्रामधील मॉनिटर , सीपीयू , कीबोर्ड माऊस , प्रिंटर असे साहित्य चोरून घेऊन गेले बाबतची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तात्काळ तपासाच्या अनुषंगाने हालचाल केली असता सदरचा गुन्हा हा विशाल विलास गलांडे रा. सुरूपखानवाडी याने त्याचे साथीदार अजित सुरेश कांबळे रा. उकिरडे आणि अविनाश हरिबा मदने रा. पिंगळी बुद्रुक यांच्या साथीने केल्याचे तांत्रिक बाबींचा उपयोग करून तसेच त्यांची गोपनीय माहितीवरून समजले.
रात्री सर्व आरोपींना शीताफिने अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून चोरलेला संपूर्ण मुद्देमाल मॉनिटर, सीपीयू , कीबोर्ड, माऊस , प्रिंटर असा किंमत रुपये पन्नास हजार पाचशे रुपये(50,500) चा हस्तगत करण्यात यश आले असून सदरचा गुन्हा अवघ्या 5 तासात उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे ,अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ,सहाय्यक फौजदार प्रकाश खाडे , सहाय्यक फौजदार अरुण दुबळे ,महिला पोलीस हवालदार दया डोईफोडे , पोलीस नाईक सचिन वावरे , पो. कॉन्स्टेबल रामचंद्र गाढवे यांनी सहभाग घेतला होता.