(गोखळी /प्रतिनिधी )” चांंगले कर्म हेच जगण्याचे खरे वर्म आहे. दुसऱ्याची जाणिव हीच भगवंताची सेवा आहे. भक्ती करताना मनातील आत्मिक शक्ती वाढीस लागावी.जन्म मरणाच्या फे-यातून बाळू मामांचे विचारच तारणार आहेत. चांगली संतती हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.” असे ठाम प्रासादिक विचार कथाकार , प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी मांडले.
श्री संत सद्गुरु बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त खटकेवस्ती – गोखळी(फलटण) येथे जन्माचे ते मूळ या प्रबोधनात्मक व्याख्यानांत प्रा. कोकरे बोलते होते. कार्यक्रमाचे आयोजन पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी केले होते.
प्रा. रवींद्र कोकरे यांनी साध्या सोप्या रसाळ वाणींतून संत बाळु मामांच्या चरित्र सांगितले भाविक भक्तांच्या अंतकरणाला स्पर्श करुन त्यांना गहिवरुन आले. हसता हसता डोळ्याच्या कडा ओलावून भाविक मंत्रमुग्ध झाले.
संत बाळूमामा पूजन , सडा रांगोळी, महाआरती , पाळणा ,पुष्पवृष्टी , महा प्रसादचे आयोजन केले होते. युवकांनी स्वच्छता करुन जन्मोत्सव साजरा केला. पहिलाच बाळूमामा जन्मोत्सव उत्स्फूर्त केल्याने ग्रामस्थ आनंदित होते.
कार्यक्रमास युवराज खलाटे,दत्तात्रय काळे बजरंग गावडे , बजरंग खटके , संतोष राऊत,सुखदेव खटके, रोहन गावडे,चेतन गावडे, निखिल खटके , मुक्ताबाई हणमंत खटके , धनश्री गावडे मच्छिंद्र खटके , सदा वळकुंदे आदि मान्यवर उपस्थित होते.