(जावली/अजिंक्य आढाव) दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या स्टाफसह अवैध धंद्यावर छापा टाकत दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील लोधवडे फाटा , गोंदवले खुर्द येथील चैतन्य हॉटेलच्या पाठीमागील बाजूस खड्ड्यात पुरून ठेवलेला अवैध विक्री साठीचा 312 बाटल्यांचा 26 हजार 760 रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला.
दहिवडी ता.माण जि. सातारा गावचे हद्दीत लोधवडे फाटा, गोंदवले खुर्द येथील चैतन्य हॉटेलच्या मागील बाजूस एक महिला दारूची चोरटी विक्री करीत असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्टाफ सह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी संशयित महिला मैनाबाई संजय तळेकर या पोत्यात देशी विदेशी दारू ठेवून विक्री करीत असलेल्या दिसल्या. तसेच आजूबाजूची पाहणी केली असता जमिनीच्यावर माती उकरलेली दिसल्याने नीट पाहिले असता दारूच्या बाटल्या प्लास्टिकच्या पोत्यात जमिनीत पुरून लपवून ठेवलेल्या दिसल्याने सर्व माल ताब्यात घेतला असता तब्बल 312 दारूच्या बाटल्यांचा 26हजार 760 रुपये किंमतीचा माल मिळुन आल. आरोपी महिला मैनाबाई संजय तळेकर यांच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 26 हजार 760 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे .अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार विठ्ठल दगडू विरकर ,पोलीस हवालदार विजय खाडे, पोलीस नाईक स्वप्नील म्हामणे, महिला पोलीस नाईक पुनम रजपूत , महिला पोलीस नाईक तनुजा खाडे यांनी कारवाई मधे सहभाग घेतला होता.