गोखळी ( प्रतिनिधी) लोणंद ता. खंडाळा येथील जुन्या पिढीतील आदर्श व्यक्तिमत्व श्रीमती यशोदा धोंडिराम शेळके- पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. अतिशय, शांत, संयमी आणि निगर्वी असा त्यांचा स्वभाव होता. त्या काकू या नावाने परिचित होत्या. ”यशोदा ज्वेलर्स” च्या माध्यमातून त्यांचे नाव सर्वदूर पोहोचले आहे. शांत आणि निर्मळ स्वभावाने त्यांनी अनेक लोक जोडले. लहान मुलांवर त्यांचा विशेष जीव होता. काकूंनी त्यांच्या एकंदर जीवन प्रवासात अनेकांना मदत व सहकार्य केले.
त्यांच्या पश्चात अनिल व शरद ही दोन विवाहित मुलगे , एक विवाहित मुलगी कल्पना तसेच सुना, नातवंडे , नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.