(जावली/ अजिंक्य आढाव)गेल्या दोन वर्षांपासून गंभीर दुखापत व मोटार सायकल चोरी प्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून , संशयित हनुमंत शामराव आवटे(वय 26) राहणार सोनगाव बंगला व गणेश अरुण जगदाळे (वय 22) रा.मोगराळे
अशी अटक केलेल्यांची नावे असुन सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल , उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस फौजदार हाके,व पोलिस कर्मचारी टिके यांनी केलेली आहे.
या बाबत माहिती अशी की जबर दुखापत करणे व मोटरसायकल चोरीमधे ते वेगवेगळ्या गुन्हात आरोपी पाहिजे होते.