हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

मिरढे .ता .फलटण येथे दुचाकीच्या अपघातात ; एक जण ठार तर एकजण गंभीर जखमी

(जावली/ अजिंक्य आढाव) मिरढे ता. फलटण गावच्या हद्दीत स्टँड जवळ दोन दुचाकींचा समोर समोर झालेल्या अपघातात बाळू कोंडीबा हाके वय 60 राहणार मिरढे ता फलटण हे जागीच ठार झाल्याचे तर सागर रुपनवर राहणार शिंगणापूर ता. माण  येथील असुन अपघातात जखमी झाले आहेत.

याबाबत भीमराव सिद्धू कचरे व 42 राहणार मिळणे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून सागर रुपनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत फलटण ग्रामीण पोलिस स्थानकानकातुन मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि. 24 रोजी 6:45 वाजण्याच्या सुमारास फलटण बाळु हाके हे मोटार सायकल एच.एफ डिलक्स क्रमांक एम एच.11सी.वाय.0338 वरुन येत होते ,त्याच वेळी शिखर शिंगणापूर बाजुकडील येणाऱ्या विना नंबर प्लेट शाईन मोटरसायकल वरील सागर रुपनवर यांनी धडक देऊन रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन, दुचाकी वेगात चालवून, रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून बाळू हाके यांच्या मृत्यूस व स्वतःच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!