(जावली/ अजिंक्य आढाव) जिंती ता. फलटण गावातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडरूमच्या कपाटातील 50 तोळे सोन्याचे दागिने लांब पास केल्याची घटना घडली आहे . याबाबत फिर्यादी आदित्य रणवरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मिळालेल्या जिंती गावातील कार्पोरेशन बंगला येथे राहणारी मेडिकल व्यवसायिक आदित्य अशोक रणवरे हे कुटुंबास समवेत रविवारी सकाळी 11 वाजता तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते.
त्यांच्या घराला कुलूप होते अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एका बेडरूम मधील कपाटातील 35 तोळ्याचे व दुसऱ्या बेडरूम मधील 15 तोळ्याचे दागिने असे एकूण 50 तोळ्याचे दागिने लांपास केले , सोमवार सकाळी 7:30 वाजता रणवी कुटुंबीय तुळजापूर मध्ये असताना त्यांना नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडण्याची माहिती आल्यानंतर घरातील 50 तोळे दागिने चोरीला गेले चे त्यांचे घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक भेट देऊन , सातारा येथून डॉग स्काॅड बोलून घेतले होते जिंतीतील भरवस्तीत घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे, गुन्हायाचा अधिक , पुढील तपास पोलिस निरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.