क्रीडा व मनोरंजन
गोखळीत हनुमान विद्यालयामध्ये.नवरात्रीनिमित्त राष्ट्रमातांच्या विचारांचा जागर
गोखळी (प्रतिनिधी) आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम काम करतात अगदी आकाशा पासून समुद्राच्या तळापर्यंत कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत नव्हे. काकणभर पुढेच आहेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम आपल्या विद्यालयांमध्ये आयोजित केला असेच उपक्रम सर्व शाळांमध्ये झाले पाहिजेत असे प्रतिपादन प्राचार्य हरीभाऊ अभंग यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.. फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील पूर्व गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यालयांमध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यवसायिक दृष्टीकोनातून पुस्तकी ज्ञानाबरोबरच माणूस म्हणून उभारणीचे ज्ञान प्रेरणा मिळावी,कलागुणांना वाव देण्यासाठी, सभाधिटपणा निर्माण व्हावा हे विद्यार्थ्यांसाठी.महत्वाच व्यासपीठ निर्माण करून दिले .