हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

कुसूमताई गावडे (सवई) यांचे निधन

गोखळी (प्रतिनिधी ): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील ह.भ.प. सौ.कुसूमताई दत्तात्रय गावडे (सवई)(वय ७९) यांचे यांचे हृदयविकाराच्या आजाराने राहत्या घरी पंचबिघा येथे निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे , एक विवाहित मुलगी आणि सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. गोखळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय बाबुराव गावडे यांच्या पत्नी , गोखळी विकास सोसायटीचे माजी चेअरमन तानाजी बापू गावडे ( सवई), श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन डॉ शिवाजीराव गावडे (सवई) यांच्या मातोश्री होत्या.

कुसूमताई यांना ‘ ताई ‘या नावाने परीसरात ओळखले जात. शांत संयमी, धार्मिक , सामाजिक, दानशूर व्यक्तिमत्व होते. राहत्या घरापासून निघालेल्या अंत्ययात्रे मध्ये पुणे सातारा, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईक आणि राजकीय सामाजिक, शैक्षणिक , वैद्यकीय , कृषी, चित्रपट क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भारत गावडे पाटील, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुनील भगत , बजरंग गावडे ह.भ.प.अशोक महाराज घाडगे, मारूती बापू गावडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!