हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

कु स्वरा भागवत ने ५ कि.मी.सायकलिग स्पर्धेत मध्ये स्विल्वर मेडल प्राप्त केले

गोखळी ( प्रतिनिधी ) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील तिरंगा पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या कुमारी स्वरा योगेश भागवत ने खेलो इंडिया CFI चॅम्पियनशिप बारामती येथे दि .२१ आक्टोबर रोजी पार पडलेल्या ५ कि.मी. सायकलिंग स्पर्धेत सबज्युनिअर मुलींमध्ये कु स्वरा भागवत ने फायनल राऊंड मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले सदर स्पर्धा आळंदी- पंढरपूर पालखी मार्गावर संपन्न झाल्या.या स्पर्धेत सहा राज्यांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. यापूर्वी मागील आठवड्यात पुणे येथे झालेल्या. पुणे युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद , पुणे व पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा पातळीवरील शालेय आर्चरी ( धनर्विद्या ) क्रिडा स्पर्धा२०२३-२४ झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला सुवर्ण पदक पटकावले .

कुमारी स्वरा हिस कोच संतोष भोसले सर यांनी मार्गदर्शन केले. लहान वयात कुमारी स्वरा पहिल्या प्रयत्नात यश मिळावले .कुमारी स्वरा ने यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर केले, वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी १२ तासात १४३ किमी सायकलिंग करुन कमी वयात विक्रम, एका मिनिटात मिनिटात शंभर पुश्यप , ५० प्रकारच्या दोरी उड्या, वयाच्या तिसऱ्या वर्षी पोहायला शिकली असा विविध प्रकारचे विक्रमाची नोंद घेऊन. वर्ल्ड बुक ऑफ इंडिया नोंद घेऊन गौरव केला आहे.

तिच्या या यशाबद्दल तिरंगा पब्लिक स्कूल चे चेअरमन रणजित शिंदे, सचिव सौ रेखाताई गावडे, तिरंगा पब्लिक स्कूल चे संचालक मनोज तात्या गावडे ( सवई), सरपंच सुमनताई गावडे, उपसरपंच स्वप्नाली गावडे खटकेवस्ती चे सरपंच बापूराव गावडे , माजी सरपंच नंदकुमार गावडे, तिरंगा पब्लिक स्कूल प्राचार्य सुरवसे सर यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!