हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

दुर्गा उत्सव मंडळ जावली यांच्या वतीने गजी नृत्य कार्यक्रम उत्साहात संपन्न

कै.सोमा धोंडी बरकडे प्रतिष्ठानच्या वतीने आकर्षक बक्षीस देण्यात आले.

(जावली/ अजिंक्य आढाव) दुर्गा मातेचा उत्सव म्हणले की, गरबा अर्थात दांडिया हा खेळ खेळला जातो परंतु दुर्गा उत्सव मंडळ जावली यांच्या वतीने आगळा – वेगळा गजी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता. नवरात्री उत्सवा निमित्ताने गावात करावी मंडळांची गाण्यां बरोबरच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, या वेळी कार्यक्रमासाठी सनई वादक म्हणून हरी आवटे ,पोपट आवटे ,बाळु आवटे व बिरदेव गजी नृत्य मंडळ (शिंदे वाडा, मिरढे) येथील ढोल्या (ढोल वादक) सहभागी होते.

महाराष्ट्राची तब्बल दीडशे ते दोनशे वर्षांंची परंपरा असलेले सुप्रसिद्ध असलेले नृत्य मानदेशी माणसाची ओळख असलेले गजी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

सादरीकरणा वेळी नृत्य करणाऱ्यांनी ढोल्या भवती रिंगण तयार करत, पंचवीस ते तीस लोकांनी सहभाग घेत अंगात पारंपारिक वेशभूषा तीन बटनी नेहरू शर्ट, डोक्यावर फेटा काढलेला तुरा दोन्ही हातात रुमाल,अशा पोषाख परिधान करून आकर्षक असे नृत्य दुर्गा देवी समोर गाण्यांचा ठेका धरत जल्लोषात सादरीकरण केले.

कार्यक्रमावेळी जावली गावचे तंटामुक्त अध्यक्ष महादेव बरकडे , जिल्हा बँक विकास अधिकारी ज्ञानदेव बरकडे, समीर आतार, माजी सरपंच सयाजी बरकडे, प्रताप ढेंगळे, गणेश मकर आदी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांच्या वतीने देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!