हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

ताथवडा घाटात लुटमार करणारी टोळी फलटण पोलिसांकडून जेरबंद ; फिल्मी स्टाईलने पोलीसांनी पाठलाग करत पकडले चोरटे

(जावली /अजिंक्य आढाव)- फलटण – पुसेगाव मार्गावर असलेला ताथवडा घाट पुर्वीपासून लुटमारी करणार्यांचा अड्डा म्हणून सर्वदूर परिचयाचा आहे.सुर्यास्त झाल्यानंतर ताथवडा घाटातून प्रवास करायचा म्हंटले की,प्रवाशांच्या मनाचा थरकाप उडतो,पण याच ताथवडा घाटात लुटमार करणार्या एका टोळीला पोलिसांनी चक्क फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गजाआड केले आहे.

सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६/१०/२०२३ रोजी १६.३० वा. कुरियर सप्लाय करणारा ऋषिकेश अनिल मिसाळ वय १९ वर्ष रा. कोळकी, ता. फलटण हा फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मानेवाडी, ता. फलटण येथे कुरियर पार्सल देण्यासाठी ग्राहकाची वाट पाहत पुसेगाव-फलटण रोडवरील मानेवाडी बसस्टॉपवर थांबला असताना फलटण बाजुकडुन दोन मोटार सायकलींवरुन आलेल्या सहा लोकांनी त्याचेजवळ जाऊन तो वाटत पाहत असलेला ग्राहक असल्याचा बहाणा करुन त्यास “पार्सल आहे का ?” असे बळजबरीने विचारले. त्यावेळी त्यांच्यांपैकी एकाने ऋषिकेश अनिल मिसाळ यास गाडीवरुन खाली पाडल्यानंतर दुस-याने त्याचे डोक्यात दगड मारून जखमी केले. त्याचवेळी इतर चौघांनी त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचेकडील रोख १०,०००/-रु.. १५,०००/- रु. चा मोबाईल हॅण्डसेट व विविध पार्सल असलेल्या एकुण २७,०००/-रु. च्या वस्तु असा एकुण ५२.०००/- रु. च्या मुद्देमालाची बॅग जबरदस्तीने घेऊन त्याला मारहाण करुन ताथवडाघाटाकडे मोटार सायकलवरून पळुन गेले. सदर घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. १५५७/२०२३. भा. दं. सं. कलम ३९५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा हा निर्जनस्थळी घडल्यामुळे कोणतीही तांत्रिक मदत मिळत नसताना फलटण ग्रामीण पोलीस ठाणेकडील पोलीसांनी पुसेगावरोडवरील सर्व हॉटेल, पेट्रोलपंप व इतर दुकानांचे सी. सी. टी. व्ही. कॅमेरे चेक केले. मानेवाडी भागातील गावांमध्ये जाऊन फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाच्या इसमांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकेठिकाणी शेतात काम करणा-या शेतक-याने फिर्यादी सांगत असलेल्या वर्णनाचे लोक बिबी बाजुकडे गेल्याचे सांगितले. या त्रोटक माहितीच्या आधारे पोलीसांनी बिबी व पंचक्रोशीतील सर्व परिसर पिंजुन काढुन आरोपींची नावे निष्पन्न करुन १ अजय संभाजी मदने वय २१ वर्ष, रा. डिस्कळ ता. खटाव २ अक्षय संभाजी जाधव वय २७ वर्ष, रा. मोळ, ता. खटाव ३. निखील उमाजी बुधावले वय २१ वर्ष, रा. बुधावलेवाडी, ता. खटाव ४. आदित्य रामदास शिरतोडे वय १९ वर्ष, रा. ललगुण, ता. खटाव ५. – २२ वर्ष, रा. कोरेगाव, ता. कोरेगाव यांना मोळ, ता. खटाव येथील एका डोंग- आकाश प्रभाकर जाधव वय याच्या पायथ्याखालून व नेर, ता. खटाव येथील धरणाचे भराव्याजवळुन पाठलाग करून २४ तासांचे आत ताब्यात घेऊन अटक करुन त्यांच्याकडुन दोन मोटार सायकलींसह एकुण २,४४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील आरोपींना मा. न्यायालयामध्ये हजर केले असता दि. २१/१०/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.

वरील गुन्हेगार हे ताथवडाघाटात छोट्यामोठ्या चो-या सतत करत होते. सदर आरोपींपैकी अजय संभाजी मदने व निखील उमाजी बुधावले यांनी दि. १३/१०/२०२३ रोजी वाखरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पेट्रोलपंपावरील कामगाराला तलवारीचा धाक दाखवुन त्याचेकडील रोख रक्कम चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांचेवर गु. र. नं. १५६८ / २०२३ भा. दं. सं. कलम ३९४ ३४ सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. समीर शेख सो अपर पोलीस अधीक्षक मा. आँचल दलाल मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल घस सो यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वाखाली पो. उ. नि. सागर अरगडे, पो. उ. नि. प्रमोद दीक्षत, पो. उ. नि. पाटील, पोलीस अमलदार योगेश रणपिसे, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे या पोलीस अधिकारी व अमलदारांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!