(जावली/ अजिंक्य आढाव)मलवडी ता. फलटण गावचा रहिवासी असलेल्या अनिल नामदेव चव्हाण (वय 42) हे नेहमी प्रमाणे प्रातः विधीसाठी मलवडी गावचे हद्दीतील फाॅरेस्ट नावांच्या शिवारात गेले असता कोणीतरी अज्ञात इसमांनी धारदार शास्त्रांने त्यांचे डोक्यात वार करून त्यांच्या जागीच खून केल्याची माहिती दिनांक १९/१०/२३ रोजी सकाळी ८वाजता च्या सुमारास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिसांना माहिती प्राप्त होताच त्यांनी लागलीच घटनास्थळी भेट दिली असता अनिल नामदेव चव्हाण यांचा मृत्यूदेह निर्जन स्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्यामुळे मयत अनिल नामदेव चव्हाण यांचे पत्नीची तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1581/ 2023 भा.द.स. कलम 302 गुन्हा 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्येकडील पोलिस हे गोपनीय माहिती व परिस्थितीजन्य पुराव्याआधारे सदर गुन्ह्यायाचा तपास करीत मयत अनिल चव्हाण याचा खुन हा महिलांबाबतच्या त्यांच्या गैरवर्तनुकिच्या कारणावरून झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे परंतु त्याचा सख्खा मावस भाऊ पोपट खाशाबा मदने “तो मी नव्हेच “या आविर्भावात गुन्ह्यायाचा घटनास्थळी बद्याच्या गर्दीत वावरत होता.पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता.परंतु पोलिसांनी बद्यांच्या गर्दीमधुन आरोपी पोपट खाशाबा मदने याच्या देहबोली चाणाक्षपणे हेरुन त्यास संशयाच्या आधारे चौकशी कामी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरूवातीला ३तास उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करणारी माहिती सांगत होता.परंतु पोलिसांनी प्राप्त परिस्थितीत जन्य पुराव्याच्या आधारे त्याच्यावर कौशल्यपूर्ण रित्या विविध प्रश्नांची सरबत्ती करीत त्यास पोलिस खाकया दाखविताच त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने अनिल नामदेव चव्हाण याचा खुन केल्याची कबुली दिली आहे.सदर गुन्ह्यायाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महाडिक हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक समीर शेख,सो.अपपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल मॅडम व उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनानुसार व सुचना नुसार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महाडिक यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि सागर अरगडे,पो.उ .नि.प्रमोद दिक्षित पो.नि.पाटील पोलिस अंमलदार संजय अडसूळ, गार्डी, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, विक्रांत बनकर, हनुमंत दडस , श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे,या पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज पाहिले आहे.