(जावली/ अजिंक्य आढाव) दमदार कामगिरी आणि पारदर्शक कारभारासाठी जिल्हात सिंघम पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असणारे दहिवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आतापर्यंत 4 पुरस्कार प्राप्त केले आहेत.
ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्ये दहिवडी पोलीस ठाणे यांनी महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तसेच सर्वात जास्त मुद्देमाल निर्गती केल्याबद्दल आणि सीसीटीएनएस कार्यप्रणाली अनुषंगाने सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन मुद्देमाल निर्गती आणि बेस्ट पोलीस स्टेशन इन सीसीटीएनएस असे चार पुरस्कार माननीय पोलिस अधीक्षक श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांच्या हस्ते आज रोजी देण्यात आले
सदर कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे विलास कुऱ्हाडे ,नीलम रासकर,नेहा कोळेकर , आसिफ नदाफ यांनी केली आहे..