आपला जिल्हा
गोखळी व मेखळी येथील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा बंधाऱ्याची गळती थांबवण्याची मागणी
गोखळी (. प्रतिनिधी ): फलटण – बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या गोखळी – मेखळी बंधाऱ्यातील त्वरित पाणी गळती थांबवावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.फलटण आणि बारामती तालुक्यातील गोखळी , खटकेवस्ती (ता.फलटण) आहे.फलटण मेखळी , सोनगाव (बारामती) गावांना ठरणारा नीरा नदीवरील गीते-पोतेकर वस्ती नजिक बंधारा 1976 मध्ये बांधण्यात आला मा. शरदचंद्र पवार साहेब व स्व बाळासाहेब गीते यांचे स्नेहाचे संबंध असल्याने नीरा नदी वर सर्वात पहिला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला सदर बंधाऱ्यांमध्ये साठणाऱ्या पाण्यावर फलटण आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती पिकांना आठ – दहा महिने उपयोग होतो.
परंतु या बंधाऱ्या तील पाणी साठवण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या लोखंडी दर्फे आणि दगडी बांधकामाची झीज झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते परिणामी बंधाऱ्यांमध्ये साठवण्यात आलेले पाणी गळतीने एक दोन महिन्यातच बंधारा रिकामा होत यामुळे नीरा नदीकाठच्या फलटण आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पिकासाठी पाण्याअभावी मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत होते. चालू वर्षी पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याची निगा आणि दुरुस्ती करण्याचे काम टेंडर ने दिले होते माळेगाव(बारामती) शाखा पाटबंधारे खात्याकडे त्याची जबाबदारी होती संबंधित अधिकाऱ्यांनी बांधाऱ्यांची दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले ठेकेदार ला स्थानिक शेतकरी भेटून काम नीट करा असे सुचवले होते .. निकृष्ट कामामुळे पाणी गळती सुरूच आहे परिणामी यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेती पिकांना पाणी न देता आल्याने शेतकऱ्यांना याची मोठी आर्थिक झळ पोचणार आहे . निरा भिमा स्थैर्यासाठी बांधण्यात आलेल्या तावशी ( इंदापूर ) येथील बंधारा अडविण्यात आल्याने त्याचा फुगवटा गीते वस्ती बंधारा पर्यंत येतो त्यामुळे दोन फळ्या(३-४ फूट) बुडतात . या पाण्याचा थोडाफार फायदा होतो पण आपल्या हक्काच्या बंधाऱ्यातील पाणी गळती मुळे शेतकऱ्यांना झळ पोहोचते. तरी संबंधित पाटबंधारे खात्याने गोखळी -मेखळी नजीक असणाऱ्या गीते- पोतेकर वस्तीवरील बंधाऱ्याची दुरुस्ती करून पाणी गळती थांबविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तसेच ठेकेदार चे बिल अदा करू नये अशीही मागणी केली आहे… या कामाचे क्वालिटी कंट्रोल व स्ट्रक्चरल ऑडिट करून सदर ठेकेदार ब्लॅक लिस्ट करून त्यांचेकडून तातडीने काम दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
दुष्काळात तेरावा महिना तोच हाच – ग्रामस्थांची चर्चा
तातडीने सर्व कार्यवाही करावी..