(जावली/अजिंक्य आढाव)छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या हा आजोळी फलटण येथे शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या समन्वयकांनी दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून तसेच 50% च्या आत मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करून राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळावे.यासाठी अंतरावली सराटी ता.अंबड जि.जालना येथे कोट्यावधी मराठा समाज एकत्र करून 14 ऑक्टोबर रोजी जागतिक विक्रम करीत मोठी सभा घेतली व आठ दिवसाच्या राज्य सरकारला अल्टिमेटम दिला असून प्रथमच जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात येत असून ऐतिहासिक दृष्ट्या असणाऱ्या फलटण नगरी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
दरम्यान मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील शुक्रवारी दि. 20 ऑक्टोबर रोजी त्यांचे सायंकाळी 7 वा फलटण येथे येत असून पश्चिम महाराष्ट्रात फलटण नगरी त्यांचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार असून 7:30 वा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जारंगे पाटील यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक सभेला व मराठा समाजाला 50% च्या आतून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत आहेत यामुळे आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यसाठी व सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा समाजाला करण्यात आले आहे.