हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

गोखळी येथे हनुमान विद्यालयात वाचन प्रेरणा दिनी “डॉ अब्दुल कलाम ” यांना अभिवादन

 गोखळी (. प्रतिनिधी ): १५ आक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जी.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन आणि भारतीय महिला हॉकी संघातील. खेळाडू वैष्णवी फाळके हिस “नवदुर्गा” म्हणून सन्मानित करण्यात आले. ‌ भारतीय सिनियर महिला हॉकी संघाचे खेळाडू वैष्णवी फाळके यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भारतीय सिनियर महिला हॉकी संघाने चीन येथे संपन्न झालेल्या एशियन गेम मध्ये भारतीय संघाने जपान संघाला ५-१ ने पराभूत करून ब्रांज पदक मिळवले या भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू कुमारी वैष्णवी फाळके खेळाडूचा हनुमान विद्यालयाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

फोटो: डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना कुमारी वैष्णवी फाळके शेजारी डावीकडून राजेंद्र भागवत, नंदकुमार गावडे, तानाजी बापू गावडे, ज्ञानदेव गावडे, बजरंग गावडे, प्राचार्य अभंग

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव गावडे ( सवई),जिल्हा परिषद सदस्य उषादेवी गावडे ,सरपंच सुमंनताई गावडे, श्रीराम बझारचे संचालक मारुतराव गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बजरंग गावडे ( सवई ), श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी गावडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे,माजी सरपंच नंदकुमार गावडे,प्राचार्य हरीभाऊ अभंग सर , अभिजीत जगताप , सागर गावडे पाटील, दादा गेजगे, योगेश भागवत, योगेश जाधव, मुन्ना शेख,वस्ताद पै बाळासाहेब साबळे(आसू), भानुदास शेडगे (सरडे),डॉ सुरेश गावडे,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भोसले, हणमंत जगताप, हनुमान माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेतील.सर्व शिक्षक व शिक्षकेतर विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन मोहन ननावरे सर यांनी केले.कार्यक्रमाचे. सुत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी केले तर आभार विद्यालयाचे प्राचार्य हरीभाऊ अभंग यांनी मानले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!