हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

राजाळे येथे राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

(प्रविण निंबाळकर/ राजाळे) राजाळे ता. फलटण येथे राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी फलटण कोरेगाव चे आमदार दीपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने हार घालून अभिवादन करण्यात आले.

फलटण परिसरात राजाळे येथील आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात होते.जयंती निमित्ताने गावातुन मिरवणूक काढण्यात आली,या वेळी सर्व महापुरुषांचे फोटो सजावट करुन ट्रॉली मधुन भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

महाराष्ट्रभर भक्ती संप्रदाय बरोबरच सामाजिकदृष्ट्या प्रबोधन करुन किर्तन साठी सुकार ह.भ.प. निवृत्ती महाराज यांचे किर्तन आयोजित केली होते.या बरोबरच विजय महाराज यांचे भारुड कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमवेळी मा. सरपंच संभाजीराव निंबाळकर,धनंजय जाधव , संदिप पवार , महावीर भालेराव, सुखदेव मदने, निळकंठ निंबाळकर, अजित निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य हणमंत गुरव ,तात्या रिटे दत्ताञय तोरसे आदी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!