हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

माणदेश हा अधिकार्यांची रत्नाची खान तसी कलाकाराची खान , शिस्त लावण्यासाठी कायद्याचा धाक इच्छा नसताना दाखवावा लागतो – उपविभाग अधिकारी अश्विनी शेंडगे

(म्हसवड /प्रतिनिधी) माणदेश ही रत्नांची खान आहे या दुष्काळी, पाणी टंचाई असलेल्या व पावसाचे अल्पप्रमाण असून पण या मातीने अनेक अधिकारी घडवणारी ही रत्नाची खान तसेच कलागुनांची हि खान आहे. या मातीतील अनेक कलाकार राज्य , देशपातळीवर आपल्या कलेचा गौरव होताना दिसत आहे. गणेशोत्सव काळात म्हसवड पोलिस ठाण्याच्या वतीने ठेवण्यात आलेल्या गणराय आवार्ड २०२३ या स्पर्धेत ज्या मंडळांनी सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा केला ती मंडळे विनर ठरली , पोलिस काम करत असताना कायदा हातात घेणार्याला शिस्तीसाठी कायद्याचा दाख इच्छा नसताना दाखवावा लागतोच गणराया आवार्ड स्पर्धेत यश मिळवले त्याचे अभिनंदन व जे राहिले त्यांनी पुढील वर्षी विजेत्या साठी प्रयत्न करावा.


असे म्हसवड येथील पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित गणराया आवार्ड २०२३ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले
म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ यांनी गेल्या वर्षापासून म्हसवड शहरातील व ग्रामीण भागातील नोंदणीकृत गणेश मंडळा मध्ये सामाजिक एकता, जागृत व्हावी या मधून चांगला उत्सव साजरा व्हावा यासाठी म्हसवड पोलिस ठाण्याने सुरू केलेल्या गणराया आवार्ड दुसऱ्या वर्षाचा हा मानाचा पुरस्कार गणराया आवार्ड २०२३ चा सोहळ माण खटावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी म्हसवड दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सरकारी वकील मुल्ला , सपोनि राजकुमार भुजबळ गणराया आवार्डचे परिक्षक व पत्रकार एल के सरतापे, पीएसआय वाघमोडे पत्रकार विठ्ठल काटकर, बापूराव मिसाळ शंकर पानसांडे, शहाजी लोंखंडे, अनिल पिसे, सचिन नवगन,माजी नगराध्यक्ष विलास माने, पोलिस पाटील, मंडळाचे पदाधिकारी नागरीक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश पुजन व गणेश गितानी करण्यात येवून उपस्थितांचे स्वागत सपोनि भुजबळ व पी.एस.आय वाघमोडे यांनी केले

बक्षीस वितरण सोहळा वेळी सर्व मान्यवर उपस्थित मंडळे

या पुरस्कार सोहळ्याची प्रस्तावना करताना सपोनि राजकुमार भुजबळ करताना म्हणाले गेल्या वर्षापासून हा सोहळा सुरू केला याला पत्रकार मित्र, नागरीक व आमचे सहकारी, पोलिस पाटील यांनी चांगले सहकार्य केल्यामुळे हा उत्सव दिवसात दिवस उत्साहवर्धक होत आहे शहरी व ग्रामीण भागातील मंडळे, तरुण युवक सामाजिक व लोक हिताच्या कामाला या उत्सवातून प्राधान्य देवून पोलिस स्टेशन हद्दीत सर्व धर्मिय कोणताहि उत्सव आनंदाने साजरा करतात गणेश चतुर्थी पासून आनंद चतुर्दशी या दहा दिवसात विद्युत रोषणाई, सामाजिक देखावे, भिती चित्रातून समाज प्रबोधन, समाज प्रबोधनाचे जिवंत देखावे, रक्तदान, डोळे तपासणी, आरोग्य तपासणी या माध्यमातून ज्या मंडळाचे जास्त गुण त्या मंडळाची निवड परिक्षक एल के सरतापे, विजय भागवत व महेश सोनवले यांनी केले जे मंडळ या स्पर्धेत आली नाहीत त्यांनी पुढील वर्षी नंबर मध्ये येण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन सपोनि राजकुमार भुजबळ यांनी केले.

अध्यक्षीय मनोगता मध्ये उपविभाग पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे म्हणाल्या म्हसवड पोलिस स्टेशनने मंडळीसाठी राबवलेले नाविन्यपूर्ण गणराया आवार्ड हा उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे या उपक्रमात केवळ पोलिसच नव्हे तर पत्रकार मित्र, कलाकार महेश सोनवले, नागरीक, पोलिस पाटील, मंडळे आदीना समावून घेऊन हा पुरस्कार सोहळा म्हणजे आमच्यासाठी एक वेगळा विरंगुळा असुन रोज मारामारी, मर्डर, डब्ल्यूए मर्डर, चोरी, तपास यातुन आम्हाला बाहेरच्या जगात काय चालले आहे हे पहाण्यास वेळ मिळत नाही आज मात्र या पुरस्कार सोहळ्याने माणदेशी माणसाच्या अंगी असलेली कला पहाण्यास मिळाली माणदेश एक नररत्न अधिकारी बनवणारी खान पाहिली होती या माणदेशात कलाकार हि कमी नाहीत हे आज महेश सोनवले यांच्या टिमने शेतकरी राजावर पाऊस पडला नाही तर काय परिस्थिती येते हे जरी दाखवले असले तरी प्रत्यक्षात प्रत्येक नागरिकांनी एक झाड लावले तर निसर्गाचा समतोल राखला जाऊ शकतो सध्या दुष्काळाचे सावट हाळू हाळू गडद होत आहे जेवढा पाऊस पाहिजे होता तेवढा झाला नाही त्यामुळे दुष्काळाच्या छटा पहावयास मिळणार आहे कायदा व सुरक्षा राखताना शिस्त बिघडली तर कायद्याचा धाक तर दाखवावा लागतोच शिस्त लावताना आमची इच्छा नसताना गुन्हा दाखल करुन आम्हाला तरुणांचे करियर बाद करायचे नसते परंतु कायद्याचा दाख तरुणांना दाखवावा लागतोच पुढे तरुणांना शेंडगे मॅडम म्हणाल्या तरुणांनी येणाऱ्या नवरात्र उत्सवात केवळ महिलांचा म्हणून बघू नका पुरुषांनी हि सहभाग घ्यावा तरुणांनी या काळात एक उपक्रम सुरू करावा दर रोज एक तास मोबाईल बंद ठेवण्याचा उपक्रम राबवावा मोबाईल मुळे काय होते हे पुसेसावळीत सर्वांनी पाहिले आहे असे उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी सांगितले यावेळी पत्रकार विठ्ठल काटकर यांनी मनोगत व्यक्त केले.

गणराया आवार्ड २०२३ चा प्रथम क्रमांक वैभव गणेश मंडळ, दुसरा सिध्दनाथ मंदिर गणेश मंडळ, व तिसरा सहकार मंडळ तर ग्रामीण मध्ये प्रथम शिवशक्ती मंडळ कुकूडवाड, दुसरा विरळी गणेश मंडळ, तर तिसरा पळशी व गट्टेवाडी गणेश मंडळ यांना विभागून देण्यात आला.

या सोहळ्याची खरी रंगत आणली ती ओमकला अविष्कार ग्रुपचे महेश सोनवले यांनी तर सोनी टीव्ही वरील म्हसवडचा डान्सर प्रथमेश माने, तर झी मराठी वरील ढोलकी च्या जालावरील म्हसवडचा लावणीसम्राज्ञी सानिका भागवत यांच्या कला पहावयास मिळाल्या या कार्यक्रमाचे आभार पीएसआय वाघमोडे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!