हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

म्हसवड पोलीस ठाण्यात गणराय आवार्ड २०२३ चे वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार

(म्हसवड /प्रतिनिधी) नुकताच झालेल्या गणेशोत्सवा निमित्ताने म्हसवड पोलीस स्टेशनने सामाजिक भान ठेवून उत्सव काळात दहा दिवस मंडळाने राबवलेले उपक्रम , समाज हिताच्या देखाव्यातुन समाजप्रबोधन, सर्व धर्म समभाव राखून शहरी व ग्रामीण भागातील मंडळांनी साजरा केले ला उत्सवातील ग्रामीण मधील तिन व शहरी भागातून तीन असे सहा उत्कृष्ट मंडळांना म्हसवड पोलिस ठाण्याच्या वतीने गणराय आवार्ड २०२३ हा मानाचा पुरस्कार गुरुवार दिनांक १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सपोनि राजकुमार भुजबळ यांनी सांगितले

गत वर्षा पासून म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांनी सुरू केलेला गणराया आवार्ड हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या वर्षापासून सुरू केला असून याचे परिक्षण अभिजित भादुले गोपनिय विभाग म्हसवड, पत्रकार एल के सरतापे , महेश सोनवले, विजय भागवत ह्यांच्याकडून ग्रामीण भागात व शहरी भागात मंडळाचे देखावे त्याचे उपक्रम पाहून त्यांना गुण दिले जातात त्याच प्रमाणे विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा, वाद्य हे पाहून शहरातील तिन व ग्रामीण भागातील तिन असे क्रमांक काढून या सहा मंडळांना गणराया आवार्ड २०२३ हा मानाचा पुरस्कार आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पोलीस स्टेशन आवारात विभागीय पोलीस उपायुक्त अश्विनी जिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडे , माणचे तहसीलदार सचिन अहिर हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाच्या वेळी नवरात्री उत्सवाच्या मंडळाची बैठक , पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील विविध भागातील गणेश मंडळे व त्याचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सपोनि राजकुमार भुजबळ यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!